फक्त माणसंच नव्हे, 'हे' प्राणीसुद्धा त्यांच्या जोडीदाराला फसवतात माहितीये?

जीवसृष्टीमध्ये अस्तित्वात असणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जीव वेगवेगळ्या कारणामुळं आपलं वेगळेपण सिद्ध करताना दिसतं. याच जीवसृष्टीचं आणखी एक रहस्य आता जगासमोर आलं आहे... 

सायली पाटील | Updated: Jan 21, 2025, 03:19 PM IST
फक्त माणसंच नव्हे, 'हे' प्राणीसुद्धा त्यांच्या जोडीदाराला फसवतात माहितीये?
Cheating and divorced is very common in penguins look for new partners to have physical relations

Animal Facts : नातेसंबंध, भावनिक गुंतागुंत जिथंजिथं येते तिथंतिथं अनेकदा नात्यांमध्ये होणारे मतभेद, वादविवादही येतातच. हल्ली याच नात्यांमध्ये एकमेकांमध्ये असणारे हेच वाद, मतभेद ही नवी बाब राहिलेली नाही. अगदी वाद विकोपास जाऊन नात्यांमध्ये येणारा दुरावासुद्धा नवा नाही. पण, आश्चर्याची बाब म्हणजे मनुष्याप्रमाणं प्राण्यांमध्येही नात्यांमध्ये दुरावा येतो. माहितीये का तुम्हाला? 

Add Zee News as a Preferred Source

जवळपास दशकाभरापासून सुरु असणाऱ्या एका निरीक्षणातून ही बाब सिद्ध झाली आहे की, मनुष्याप्रमाणंच पेंग्विन हा बर्फाळ प्रदेशातील प्राणीसुद्धा जोडीदारासमवेत शारीरिक संबंध ठेवतात, थोडक्यात प्रजनन प्रक्रिया या प्राण्यांमध्येही आढळते आणि तेसुद्धा जोडीदारासोबतचं नातं अधिक दृढ करण्यासाठीचा दुवा शोधत असतात. 

संशोधक आणि अभ्यासकांच्या मते 13 प्रजनन काळांमध्ये अर्थात ब्रिडींग पिरिडमध्ये करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार पेंग्विनच्या 37000 वस्त्यांमध्ये जोडीदाराला सोडण्याचं प्रमाण अधिक दिसून आलं. सहसा निराशाजनक प्रजनन काळानंतर पेंग्विनमध्ये हा बदल दिसून येतो. अहवालानुसार पेंग्विनमधील जोडीदाराला सोडण्याच्या या वर्तणुकीतून त्यांच्या गटाची प्रजनननातील यशस्वी कामगिरी प्रभावित होते. ज्यामुळं वाईट प्रजनन काळानंतर पेंग्विन नव्या जोडीदाराचा शोध घेतात जेणेकरुन भविष्यात प्रजनन प्रक्रियेमध्ये त्यांना अडचणी येणार नाहीत. 

हेसुद्धा वाचा : विज्ञानालाही शह देत अमेरिकेनं बांधलं जगातील सर्वाच उंच धरण; इथं हवेत तरंगते प्रत्येक गोष्ट 

सदर निरीक्षणामध्ये समाविष़्ट करण्यात आलेल्या 1000 पेंग्विन जोड्यांपैकी 250 जोड्या विभक्त झाल्या होत्या. तर, काही महिला पेंग्विनच्या जोडीदाराचा मृत्यू झाला होता. निरीक्षणानुसार ज्या पेंग्विनचं आपल्या जोडीसोबतचं नातं अधिक काळासाठी टीकतं त्यांची प्रजनन क्षमता काळानुरूप वाढत जाते. 

बर्फाळ प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या पेंग्विनचे आजवर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही निरीक्षणपर अहवालांनुसार या प्राण्यांच्या प्रजातीला धोकाही असल्याचं म्हटलं जात असतानाच समोर आलेला वरील अहवाल या प्रजातीसंदर्भातील सखोल माहिती देऊन जात आहे. 

 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More