China Ship Senkaku Islands: भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेला चीन हा फक्त भारतासाठीच धोका नाही तर अनेक देशांसाठी डोकेदुखी आहे. चीनने आजपर्यंतचा सर्वात भयानक प्लान बनवला आहे ज्यामुळे जपानमध्ये खळबळ उडाली आहे. समुद्रातील 7 किमीचा भाग हडपण्याचा चीनचा डाव आहे. चिनी जहाजे 92 तास जपानी बेटांजवळ फिरत राहिली.
पूर्व चीन समुद्रातील जपानच्या सेनकाकू बेटांजवळ चीनच्या जहाजांनी घुसखोरी केल्याने खळबळ उडाली आहे. चिनी तटरक्षक दलाची जहाजे अनेक दिवस तिथेच तळ ठोकून राहिली. एखादा रिकामा भाग दिसला तर त्याने तिथे काही काळासाठी तळ ठोकायचा आमइ तो भाग ताब्यात घ्यायचा असा चीनचा डाव आहे. चीनच्या या कृतीवर जपानने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
जपानच्या सुरक्षा संस्थांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चीनने जपानी बेटाजवळील समुद्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. चिनी तटरक्षक दलाची जहाजे सेनकाकू बेटांजवळ 92 तास 8 मिनिटे फिरत राहिली. सोमवारी रात्री ही जहाजे परत फिरली. नकाकू बेटांजवळ चिनी जहाजांच्या हालचाली स्पष्टपणे वाढत असल्याचे जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांनी सांगितले.
शुक्रवारीच चिनी तटरक्षक दलाच्या जहाजांनी या निर्जन बेटांजवळील जपानी सागरी क्षेत्रात आपल्या हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी टोकियो येथे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांनी चिनी जहाजांच्या उपस्थितीबद्दल जपानने चिंता व्यक्त केल्याचे इवाया यांनी एका सरकारी समितीला सांगितले.
सेनकाकू बेटांवरून जपान, चीन आणि तैवानमध्ये अनेक दशकांपासून वाद सुरू आहे. पूर्व चीन समुद्रातील लहान, निर्जन बेटे आणि खडकांचा समूह जपानच्या मालकीचा आहे. हे जपानमध्ये सेनकाकू बेटे, चीनमध्ये दियाओयू बेटे आणि तैवानमध्ये दियाओयूताई बेटे म्हणून ओळखले जाते. 7 चौरस किमी क्षेत्रफळ असलेले सेनकाकू हे महत्त्वाच्या शिपिंग मार्गांच्या जवळ असल्याने त्याचे धोरणात्मक महत्त्व आहे. मासेमारीसाठी देखील हे एक उत्तम क्षेत्र आहे. तसेच येथे तेलाचे मुबलक साठे असू शकतात.
सध्या, इंडो-पॅसिफिकमध्ये प्रभावासाठी चीन-अमेरिका वाढत्या संघर्षात ते एक प्रॉक्सी युद्धभूमी बनले आहे. जपान हा अमेरिकेचा एक प्रमुख मित्र आहे. सेनकाकू बेटांचा मुद्दा पुढे ढकलण्यासाठी त्यांनी चीनसोबत कधीही कोणताही करार केलेला नाही असे सातत्याने जपानकडून सांगितले जात आहे. 1192 मध्ये, चीनने सागरी क्षेत्र आणि भूभागांवरील कायदा लागू केला, ज्यामध्ये चीनच्या भूभागाचा भाग म्हणून बेटांवर आपला दावा स्पष्टपणे नमूद करण्यात आला. 2008 पासून, चीन सेनकाकू बेटांजवळील समुद्रात आपली जहाजे तैनात करुन जपानी हद्दीत घुसखोरी करत आहे.