लंडन ; भारतात २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. सोबतच ५ वाजता त्यांनी कोरोनाचा सामना करणाऱ्या डॉक्टर, पालिका कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि इतर सर्व लोकांचे आभार मानन्यासाठी टाळी आणि थाळी वाजवण्याचं आवाहन केलं होतं. विशेष म्हणजे या आवाहनाला देशभरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर ब्रिटेनमध्ये देखील अशाच प्रकारे टाळी आणि थाळी वाजवून डॉक्टर, मेडिकल वर्कर्स आणि कोरोनो कमांडोज यांचे आभार मानले गेले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉलिवूडची हॅरी पॉटर फेम अभिनेत्री एमा वाटसन आपल्या इस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ज्याप्रकारे भारतात तुम्ही आवाज ऐकला तसाच आवाज ऐकू येत आहे. एमाने व्हि़डिओ शेअर करत म्हटलं की, 'मला त्या देशाचा अभिमान आहे. जो कोणालाही मेडिकल मदत देण्यासाठी तयार असतो. मी आपल्या मेडिकल वर्कर्स आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानते. हा व्हि़डिओ नताशा क्लार्कने शूट केला आहे.'



ब्रिटेनच्या लोकांनी तसेच इंग्लंडमधील रॉयल परिवाराने देखील टाळ्या वाजवून मेडिकल वर्कर्स आणि डॉक्टरांचे आभार मानले. अनेकांनी व्हिडिओ शेअर केले आहेत.


जगभरात कोरोना पाय पसरवत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. डॉक्टर त्यासाठी मेहनत घेत आहेत. २२ मार्चला पंतप्रधान मोदी यांनी टाळी, थाळी किंवा शंखनाद करुन या सर्वांचे आभार मानन्याचं आवाहन केलं होतं. स्पेन आणि इटलीमध्ये देखील हा प्रयोग करण्यात आला.


कोरोनाचा आतापर्यंत ५ लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. ज्यापैकी २५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात रुग्णांची संख्या ९०० वर पोहोचली आहे. तर २० लोकांचा मृत्यू झाला आहे.