पूल तुटला, धुळीचे लोट उसळले अन्...; किंकाळ्याच्या आर्त हाकेत 32 खाण कामगारांचा मृत्यू... थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर

Congo mine bridge collapse Video: अतिशय विचित्र अशा अपघातानं जगभरात चिंता वाढवली असून, यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कुठं घडली ही दुर्घटना?

सायली पाटील | Updated: Nov 17, 2025, 11:35 AM IST
पूल तुटला, धुळीचे लोट उसळले अन्...; किंकाळ्याच्या आर्त हाकेत 32 खाण कामगारांचा मृत्यू... थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर
Congo mine bridge collapse above 32 people killed in Congo copper mine scary horrific video viral

Congo mine bridge collapse Video: सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ समोर येतात, जे सातत्यानं चिंतेत भर टाकताना दिसतात अशाच व्हिडीओंमध्ये आता एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. दक्षिण पूर्व काँगो येथील कलंदो येथील तांबे आणि कोबाल्टच्या खाणीतील ही दुर्घटना असून, शनिवारी इथं एक भयावह घटना घडली. एकाएकी पूल ढासळल्यानं यादुर्घटनेत 32 खाण कामगारांचा मृत्यू ओढावला. 

Add Zee News as a Preferred Source

स्थानिकांच्या माहितीनुसार प्रचंड पावसामुळं हा पूल सुस्थितीत नव्हता. मात्र, इथं अवैधरित्या खाणकाम करणाऱ्या खाण मालकांनी मात्र सातत्यानं पुलाच्या स्थितीसंदर्भात देण्यात आलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि कामगार या पुलावर चढले. याच दरम्यान घडलेल्या भीषण दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आणि अनेकांच्याच काळजात धस्स झालं. AP च्या वृत्तानुसार स्थानिक गृहमंत्री रॉय कोम्बा मायोंडे यांच्या माहितीनुसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लुआलाबा प्रांतातील मुलोंडोमध्ये असणाऱ्या कलंदो खाणीतील पूल वाहून गेल्याचं सांगितलं. प्रचंड पाऊस आणि भूस्खलनाचा धोका याबाबतचा इशारा देऊनही अवैधरित्या इथं खाणकाम सुरूच होतं. जिथं प्रतिबंधित ठिकाणी कामगार केले आणि या पुलावर इतकी गर्दी झाली की तो क्षणात कोसळला. 

काही कळायच्या आतच पूल कोसळल्यानं तिथं असणाऱ्यांनी घाबरून आजुबाजूच्यांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला आणि यामध्येच अनेकांचा मृत्यू ओढावला. या दुर्घटनेतील मृतांची संख्या साधारण 32 ते 40 दरम्यान सांगण्यात येत आहे. दरम्यान य़ा खाणीत मागील काही वर्षांमध्ये असणारी लष्करी उपस्थिती वादाचं कारण ठरत आहे. इथं सैनिक अवैधरित्या खाणकाम करणाऱ्यांना रोखण्यासाठी येतात. ज्यामुळं खाण कामगार आणि त्यांच्यामध्ये कायमच तणाव पाहायला मिळतो. इथं एक स्थानिक सहकारी संस्था खाणकामगारांना काम देते तर, परवानाधारक चिनी कंपन्या या खाणीचं कामकाज पाहतात. 

हेसुद्धा वाचा : अमेरिकेच्या 'टाईम्स स्क्वेअर'मध्ये संत सिंग चटवाल यांच्याकडून 'लंगर'चं आयोजन; हजारोंच्या समुदायासाठी अन्नदान करणारी ही व्यक्ती कोण?

चीनची वादात काय भूमिका? 

अहवालानुसार काँगोच्या जवळपास 80 टक्के कोबाल्ट उत्पादनावर चीनमधील कंपन्यांचा वरदहस्त असून, मोबाईल, इलेक्ट्रीक वाहनं यांचा वापर तिथं केला जातो. या कंपन्यांवर बालमजदुरी, धोकादायक कामाच्या ठिकाणी होणारा भ्रष्टाचार असे कैक गंभीर आरोप आहेत, शिवाय कंपनीकडून खाणकामगारांसाठी कोणतीही सुरक्षाव्यवस्था नाही. काँगोमध्ये खनिजसंपदा प्रचंड प्रमाणात असली तरीही इथं राजकीय अस्थिरता असल्यानं स्थानिक पातळीवर लाखो नागरिक बेघर आहेत, उपासमारीचं प्रमाण अधिक असून इथं आजारपही प्रचंड प्रमाणआत आढळतं हे दाहक वास्तव. अशा स्थितीत निरपराध खाणकामगारांवर ओढावलेला मृत्यू पाहता या घटनेची जबाबदारी कोण घेणार? हाच प्रश्न उपस्थित होत आहे. 

FAQ

ही दुर्घटना नेमकी कधी आणि कुठे घडली?
15 नोव्हेंबर 2025 (शनिवार) रोजी डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) च्या दक्षिण-पूर्व लुआलाबा प्रांतातील कलांडो (Kalando) कॉपर-कोबाल्ट खाणीत (मुलोंडो परिसरात) हा पूल कोसळला. 

मृतांची संख्या किती आणि कारण काय?
प्रादेशिक गृहमंत्री रॉय काउंबा मायोंडे यांनी किमान 32 मृत्यू निश्चित केले आहेत. SAEMAPE (काँगोची आर्टिसनल माइनिंग एजन्सी) च्या अहवालात 40 ते 49 मृत्यू आणि 20 जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले आहे

चीनची भूमिका काय आणि खाणीत एवढ्या दुर्घटना का होतात?
काँगो जगातील सर्वात मोठा कोबाल्ट उत्पादक देश आहे (इलेक्ट्रिक वाहने, मोबाईल बॅटरीसाठी आवश्यक). यातील जवळपास 80% उत्पादन चिनी कंपन्यांच्या नियंत्रणात आहे. या कंपन्यांवर बालमजुरी, असुरक्षित कामाच्या जागा, भ्रष्टाचार आणि सुरक्षेच्या सुविधा न देण्याचे गंभीर आरोप आहेत. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More