Massive Coronal Hole Spotted on Sun Surface: नासाच्या (NASA)  शास्त्रज्ञांनी दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्यामुळे सगळ्यांचीच जोप उडाली आहे. सूर्यावर पृथ्वीपेक्षा 20 पट मोठा खड्डा पडला आहे. यामुळे सौरवादळ निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. याचा फटका पृथ्वीला बसणार आहे. NOAA ने भूचुंबकीय अर्थात सौरवादळाचा इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

NOAA ही अमेरिकन फेडरल एजन्सी आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर खड्डा पडल्यामुळे वारे ताशी 29 लाख किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने सरकत आहेत. शुक्रवारी हे सौर वादळ पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. पृथ्वीवर हे वादळ धडकल्यास मोठा फाटका बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या सौर वादळाम उपग्रह, मोबाईल फोन आणि जीपीएस यंत्रणा प्रभावित होऊ शकतात. मोबाईलचे नेटवर्क डिस्कनेक्ट होऊ शकते.  जीपीएसची सिग्नल यंत्रणा गायब होऊ शकते.


सूर्यावर पडलेल्या या खड्ड्याला वैज्ञानिक भाषेत कोरोनल होल असे म्हणतात. 23 मार्च रोजी नासाच्या SDO (सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरी) ला सूर्याच्या दक्षिण ध्रुवाजवळ एक कोरोनल होल निदर्शानस आला होता. याचा आकारमान अतिशय महाकाय आहे. या कोरोनल होलची लांबी तीन लाख आणि रुंदी चार लाख किलोमीटर इतकी आहे. यामध्ये  20-30 पृथ्वी सामावून घेऊ शकतात. सूर्याच्या पृष्ठभागावर खड्डा पडल्यानंतर वारे ताशी 29 लाख किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने सरकत आहेत. 


कोरोनल होल म्हणजे पृथ्वीवरील कृष्णविवर


सूर्याच्या पृष्ठभागावरील कृष्णविवरांना कोरोनल होल म्हणतात. हे कोरोनल होल काळ्या रंगाचे असतात. सभोवतालच्या प्लाझ्मापेक्षा थंड, कमी दाट प्रदेश आणि खुल्या एकध्रुवीय चुंबकीय क्षेत्राच्या प्रदेशांमुळे हे कोरोनल होल काळ्या रंगाचे असतात. सूर्याच्या पृष्ठ भागावर हे कोरोनल होल कधीही आणि कुठे तयार होवू शकतात.