हजारो फूटावर लावलेल्या वेब कॅममध्ये कैद झाला कपलचा 'तो' खासगी क्षण

डोंगरावर खासगी क्षण घालवणं कपलला पडलं महागात 

Updated: Jun 22, 2021, 08:09 AM IST
हजारो फूटावर लावलेल्या वेब कॅममध्ये कैद झाला कपलचा 'तो' खासगी क्षण

मुंबई : एका कपलला उंच डोगरांवर रोमान्स करणं पडलं महागात. हे कपल चक्क 6500 फूट उंचावर आपले खासगी क्षण अनुभवत होते. पण या डोंगरावर असलेल्या वेब कॅममुळे कपलचा 'तो' खासगी क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एवढंच नव्हे तर हे फोटो ऑनलाइन पोस्ट केले आहेत. (Couple are caught having sex by webcam 6500ft up Austrian mountain) 

ऑस्ट्रियातील पश्चिम भागातील सर्वात उंच डोंगरांच्या नॉक पर्वतावर ही घटना घडली आहे. याठिकाणी एक कपल ट्रेकिंग रता गेले होते. त्यानंतर दोघांनी तेथेच विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला. थोड्यावेळाने हे कपल त्याच ठिकाणी झोपी गेले. 

कालांतराने हे कपल रोमान्स करू लागले. त्यांना त्यावेळी अंदाज नव्हता की, त्यांच्यासोबत असं काही होईल. या डोंगरांवर लावलेल्या या वेब कॅम त्यांचा तो खास क्षण कैद झाला. या कॅमेऱ्यात कपलचे न्यूड फोटो कॅमेऱ्यात क्लिक झाले. कालांतराने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

वेब मीडिया सोल्यूशन्सचे रोनाल्ड श्र्लेंडरचं म्हणणं आहे की, पॅनोरमा आणि वातावरणाकरता असलेल्या कॅमेऱ्यात हे क्षण रेकॉर्ड झाले आहेत. कारण हा कॅमेरा सतत रेकॉर्ड करत असतो. यामुळे कपलचा हा खासगी क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे झाल्याचं म्हटलं आहे.

पुढे त्यांनी म्हटलं की, कॅमेरा अशा पद्धतीने लावण्यात आला आहे की, यामध्ये जर एखादी व्यक्ती कैद झाली तर त्याचा चेहरा स्पष्ट दिसू नये. कारण हे कॅमेरे फार लांब लावले जातात. त्याच्या रिझोल्यूशनच्या मदतीने हे फोटो घेतले जातात. 

सॉफ्टवेअरच्या एका चुकीमुळे कपलचे खास क्षण लीक झाले. स्थानिक मीडियानुसार, नोकाम रोडवर लिहिलं आहे की, या क्षेत्रात कॅमेरा आहे. या प्रकरणात आतापर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रियामध्ये पब्लिक प्लेसमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगला खूप गांभीर्याने मॉनीटर केलं जात आहे. लोकांच्या प्रायवसीला पूर्ण सन्मान दिला जातो.