स्वत:चं तोंड फोडून या जोडप्याने सिद्ध केलंय, SEX हवेत करण्याची गोष्ट नाहीय... कसं ते पाहा

एकमेकांच्या प्रेमात वेडी झालेली जोडपी काय करतील, याचा नेम नाही.करायला गेलो एक आणि झालं भलतंच

Updated: Apr 6, 2021, 08:33 PM IST
स्वत:चं तोंड फोडून या जोडप्याने सिद्ध केलंय, SEX हवेत करण्याची गोष्ट नाहीय... कसं ते पाहा

लंडन : एकमेकांच्या प्रेमात वेडी झालेली जोडपी काय करतील, याचा नेम नाही.करायला गेलो एक आणि झालं भलतंच, असं अनेकांचं प्रेमात होतं, असाच एक धक्कादायक किस्सा इंग्लंडमध्ये घडलाय. लेस्ली आणि विल्यम या जोडप्याला भलतंच काहीतरी करण्याची लहर आली, त्यांच्यामधली लेस्ली तर सेक्युअली जास्तच अँक्टिव्ह आहे.  ती वेगवेगळ्याफँटसीज शोधत असते. आपण आकाशात उडता उडता म्हणजेच स्काय डायव्हिंग करता करता सेक्स करुया असं तिनं विल्यमला सुचवलं. 

दोघंही हा विचित्र प्रकार करायला तयार झाले. आकाशामध्ये सेक्स करण्यासाठी दोघांनीही विमानातून उडी घेतली. दोघेही सेक्समध्ये एवढे गुंग झाले की आपण नक्की काय करतोय, कुठपर्यंत पोहोचलोय याचं भानच लेस्ली आणि विल्यमला राहिलं नाही. जेव्हा ते भानावर आले, तेव्हा ते दोघेही जमिनीच्या अगदी जवळ आले होते. 

या सगळ्या नादात विल्यम त्याचं पॅराशूटच उघडायचं विसरला आणि जमिनीवर धाडकन जाऊन आपटला.

लेल्सीनं मात्र तिचं पॅराशूट उघडलं होतं. ती विल्यमच्या थोडं पुढे जाऊन लँड झाली. विल्यमला जमिनीवर आदळलेलं पाहिल्यावर ती चांगलीच घाबरली, विल्यमचा मृत्यू झालाय असं तिला वाटलं. पण तो जिवंत होता. पण या अपघातात विल्यमचं नाक फुटलंय. त्यामुळे दोघांनाही ताबडतोब हॉस्पिटल गाठावं लागलं. आकाशात जाऊन भलतं सलतं करण्याचा प्रकार या दोघांच्या चांगलाच अंगलट आलाय.