Crime News : पोटच्या मुलाने आईच्या मृतदेहासोबत नेमकं काय केलं, ज्यामुळे मिळवले 44 लाख रुपये

 पैसा ही अशी गोष्ट आहे की, ज्यामुळे भल्या भल्यांचे डोळे फिरतात.

Updated: Sep 12, 2021, 08:35 PM IST
Crime News : पोटच्या मुलाने आईच्या मृतदेहासोबत नेमकं काय केलं, ज्यामुळे मिळवले 44 लाख रुपये

मुंबई : पैसा ही अशी गोष्ट आहे की, ज्यामुळे भल्या भल्यांचे डोळे फिरतात. ज्यामुळे लोकं नाती देखील पाहत नाहीत. असं एक कृत्य घडलं आहे की, ज्यामुळे तुम्हाला धक्काच बसेल आणि कोणाता मुलगा आपल्या आईसोबत असं करु शकतो यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. यामुलाने पैशाच्या लोभापोटी आपल्या आईच्या मृतदेहासोबत असे कृत्य केले आहे की, पोलिसांनाही सत्य कळल्यावर आश्चर्य वाटले.

आईची पेन्शन मिळत राहण्यासाठी, लोभी मुलाने आपल्या आईच्या मृतदेहाला (Man Earns 44 Lakhs From Dead Body) अनेक महिने आपल्या घराच्या तळघरात लपवून ठेवला. या 84 वर्षीय महिलेचा जून 2020 मध्ये झाला. तिचा मृत्यू तसा नैसर्गिक होता. परंतु आपली आई गेल्यामुळे आपल्याला तिच्या पेन्शनचे पैसे मिळणार नाही म्हणून मुलाने तिच्या मृतदेहाला आपल्या घरातील तळघरात लपवून ठेवले. तेव्हापासून तिचा मृतदेह त्यांच्या घराच्या तळघरात पडला होता.

मृतदेहाचे ममीमध्ये रूपांतर करण्यात आले

मृत आईची पेन्शन मिळवण्यासाठी, मुलाने तिच्या शरीराचे ममीमध्ये रूपांतर करुन जवळ-जवळ सव्वा वर्ष आपल्या तळघरात (Mothers Corpse Mummified) ठेवण्यात आले. मृतदेहाला दुर्गंध येऊ नये म्हणून बर्फ आणि विविध रासायनिक पट्ट्यांचा वापर त्यामुलाने केला.

खरेतर एका पोस्टमनच्या संशयावरून पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. मीडिया अहवालानुसार, पोलिसांनी सांगितले आहे की, आरोपीने आईचा मृतदेह सव्वा एक वर्ष ममी बनवून घरात लपवून ठेवले, जेणेकरून आईची पेन्शन थांबणार नाही.

मृत महिलेचा 66 वर्षीय मुलगा गेल्या एक वर्षात त्याच्या आईचे पेन्शन आणि सरकारी भत्ता सुमारे £42,000 (42 लाख रुपयांहून अधिक) घेतला आहे. सोशल वेलफेयर मेलसंदर्भात पोस्टमनला त्या महिलेला भेटायचे होते, तेव्हा तिच्या मुलाने नकार दिला. यानंतरच पोस्टमनला महिलेच्या बेपत्ता होण्याचा संशय आला आणि त्याने पोलिसांना माहिती दिली.

आईच्या मृत्यूची बाब भावापासून देखील लपवून ठेवली

पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा फसवणूक युनिटचे प्रमुख हेल्मुट गुफलर  म्हणाले, "जर महिलेच्या मृत्यूची नोंद झाली असती, तर तिला मिळणारे सर्व फायदे थांबले असते." त्या माणसाकडे उत्पन्नाचे इतर कोणतेही स्रोत नसल्याने त्याने आपल्या आईचा मृत्यू लपवण्याचा निर्णय घेतला. त्याने एक वर्ष आपल्या भावाला फसवले की, आई आजारी आहे आणि तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे."

पोलिसांनी सांगितले की, मात्र, त्याने आपल्या आईची हत्या केली नाही. हा मृत्यू नैसर्गिक होता हे तपासात समोर आले आहे. मात्र, आता त्याच्यावर आईचा मृतदेह लपवून ठेवणे आणि तिच्या नावावर चुकीच्या मार्गाने पेन्शन आणि सरकारी फायदे घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑस्ट्रेलीयातील असल्याचे सांगण्यात येत आहे.