Richest Pakistani Hindu : पाकिस्तान हा मुस्लिम देश असून, इथे फाळणी झाल्यानंतरही अनेक हिंदू लोक आजही राहतात. पाकिस्तानच्या लोकसंख्येबद्दल बोलायचं झालं तर तिथे 52 लोख लोक राहतात. तसे भारतात मुस्लिम लोक राहतात, तसंच या पाकिस्तानच्या लोकसंख्येत अनेक हिंदू लोकही राहतात. पाकिस्तानमधील या हिंदू लोकांची संख्या पाहिली तर ती फक्त 2.17 टक्के एवढीच आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या फक्त 2.17 टक्के हिंदू लोकसंख्येत काही लोक हे करोडपती आहेत.आज आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, जो पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत हिंदू आहे.
यांचं नाव दीपक परवानी असून तो प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की हा एक अभिनेतादेखील आहे. त्याने अनेक पाकिस्तानी नाटकांमध्ये काम केलंय. दीपक परवानी यांचा जन्म 1974 मध्ये पाकिस्तानातील सिंध प्रांतातील मीरपूर खास इथला आहे. त्यांनी 1996 मध्ये फॅशन इंडस्ट्रीत प्रवेश केला असून स्वतःचा फॅशन ब्रँड 'डीपी' सुरू केला. त्यांचा ब्रँड विशेषतः वधू आणि औपचारिक पोशाखांसाठी प्रसिद्ध असून त्याच्या डिझायनिंग कला आणि उत्कृष्ट कामामुळे तो केवळ पाकिस्तानातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे.
2014 मध्ये बल्गेरियन फॅशन अवॉर्ड्समध्ये दीपक परवानी यांना जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वोत्तम फॅशन डिझायनर म्हणून निवडण्यात आले आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात मोठा कुर्ता तयार करून त्यांनी आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. त्यांनी भारतीय गीतकार जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी, प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी सारख्या प्रसिद्ध व्यक्तींसोबतही काम केलंय.
दीपक परवानी यांच्या मालमत्तेबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तर मीडिया रिपोर्टनुसार 2022 मध्ये त्यांची एकूण संपत्ती ही 71 कोटींच्या घरात होती. तर दीपक परवानी यांनी फॅशन, संस्कृती आणि कला क्षेत्रात दिलेल्या योगदानाने त्यांच्या समुदायाला अभिमान आहे.