भारतावर डायरेक्ट 500 टक्के टॅरिफ लादणार? अमेरिकेच्या संसदेत विधेयक मंजुरीसाठी; डोनाल्ड ट्रम यांच्या एका निर्णायामुळे जगात खळबळ

अमेरिकेच्या एका निर्णायमुळे भारतात महागाई 500 टक्क्यांनी वाढणार आहे. कारण, भारतावर डायरेक्ट 500 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय अमेकिकेने घेतला आहे. अमेरिकेच्या संसदेत विधेयक मंजूरीसाठी मांडले जाणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 9, 2026, 05:58 PM IST
भारतावर डायरेक्ट 500 टक्के टॅरिफ लादणार? अमेरिकेच्या संसदेत विधेयक मंजुरीसाठी; डोनाल्ड ट्रम यांच्या एका निर्णायामुळे जगात खळबळ

Donald Trump To Impose 500 Percent Tariff On India :  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल किंवा युरेनियमसारख्या वस्तू आयात करणाऱ्या देशांवर 500 टक्के कर लादण्याचे विधेयक मंजूर केले आहे. भारत, चीन आणि ब्राझील हे रशियन तेल आणि युरेनियमचे प्रमुख आयातदार आहेत. जर हे विधेयक मंजूर झाले तर या देशांवर 500 टक्के कर लागू होऊ शकतो. म्हणजेच अमेरिका भारतावर 500 टक्के टॅरfफ लादणार आहे. सध्या अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादले आहे.  

Add Zee News as a Preferred Source

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या प्रस्तावित 500 टक्के कर विधेयकाची माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "आम्हाला या विधेयकाची माहिती आहे. 'कोणत्याही दबावाखाली भारताचे ऊर्जा धोरण बदलणार नाही' याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "ऊर्जा स्रोतीकरणाच्या मोठ्या प्रश्नावर आमची भूमिका सर्वज्ञात आहे. जागतिक बाजारपेठेतील बदलत्या गतिमानतेमुळे आणि आमच्या 1.4 अब्ज भारतीय नागरिकांच्या ऊर्जा सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध स्रोतांमधून परवडणारी ऊर्जा मिळवण्याच्या गरजेबाबतचे धोरण बदलणार नाही. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका नवीन विधेयकाला हिरवा कंदील दिला आहे. या विधेयकामुळे वॉशिंग्टनला रशियन पेट्रोलियम उत्पादने खरेदी करणाऱ्या देशांवर मोठ्या प्रमाणात कर लादण्याची परवानगी मिळणार आहे. यामुळे रशियनाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतावर 500 टक्के पर्यंत कर लादला जाऊ शकतो. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेतील आधीच ताणलेले व्यापारी संबंध अधिक गुंतागुंतीचे होऊ शकतता. 

2025 चा रशिया कायदा नावाचा हा प्रस्तावित कायदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जाणूनबुजून रशियन पेट्रोलियम आणि युरेनियम उत्पादनांच्या देवाणघेवाणीत सहभागी असलेल्या देशांवर मोठ्या प्रमाणात कर लादण्याचा अधिकार देतो. अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंजुरीनंतर, हे विधेयक आता द्विपक्षीय मंजुरीसाठी पुढे जात आहे. पुढील आठवड्यात त्यावर मतदान होऊ शकते. अमेरिकन काँग्रेसच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, जर हे विधेयक मंजूर झाले, तर "रशियन मूळच्या युरेनियम आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या देवाणघेवाणीत जाणूनबुजून सहभागी असलेल्या देशांकडून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांवर राष्ट्रपतींना 500 टक्क्यांपर्यंत शुल्क वाढवावे लागेल.

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More