)
Donald Trump India Russia : (India vs America) भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये असणारं आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय नातं गेल्या काही काळापासून गटांगळ्या खाताना दिसत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळं या तणावात आणखी भर पडू शकते असं म्हटलं जात आहे. नुकतंच अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की यांची भेट घेतली आणि याच भेटीदरम्यान त्यांनी एक अनपेक्षित दावा केला.
भारत आता रशियाकडून (Russia) तेल खरेदी करणार नाही असा दावाच थेट ट्रम्प यांनी झेलेंस्कींसमोर केला. याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची हमी दिल्याचंही वक्तव्य केलं होतं. भारतानं तेल आयात कमी केली असून हे एक मोठं पाऊल असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपण आता चीनवरही हेच दबावतंत्र आजमावणार असून, रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी त्यांना भूमिका घ्यायला लावू असाही दावा त्यांनी केला.
एकिकडे ट्रम्प जागतिक स्तरावर हे दावे करत असतानाच भारताच्या पररराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मात्र मंत्रालयाच्या वतीनं हे सर्व दावे फेटाळले. मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये सदर मुद्द्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही असं म्हणत हल्लीच्या दिवसांमध्ये या दोन नेत्यांमध्ये दूरध्वनीवरून संपर्क साझण्यात आलेला नाही त्यामुळं तेल खरेदीबाबतच्या आश्वासनाचा इथं प्रश्नच येत नाही असं भारताकडून ठामपणे सांगण्यात आलं.
अमेरिकेच्या भूमिकेनुसार रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यानं मॉस्कोला युक्रेनसोबतच्या युद्धामध्ये आर्थिक सहाय्य होत आहे. चीनकडूनही याचीच पुनरावृत्ती होत असल्यानं ट्रम्प यांनी हरकत दर्शवली होती. पत्रारांनी याच मुद्द्याला अनुसरून जेव्हा ट्रम्प यांना हंगेरीकडून रशियातूनन तेलाची आयात होण्यासंदर्भातील प्रश्न विचारला तेव्हा मात्र त्यांनी काहीशी सौम्य भूमिका घेतली. हंगेरी एका प्रकारे अडचणीत असून या देशाता स्वत:चा समुद्र नाही, तेलाच्या आयातीसाठी त्यांना पाईपलाईनचाच आधार आहे. ज्यामुळं तेसुद्धा तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांत आहे.
दर दिवशी विविध धोरणांवरून आणि प्राख्यानं आता रशियावर ट्रम्प यांचं लक्ष केंद्रीत असल्या कारणानं आंतरराष्ट्रीय राजकारणात आता पुढं या प्रकरणाला नेमकं काय वळम मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ट्रम्प यांनी भारताविषयी काय दावा केला?
अमेरिकी राष्ट्राधीक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांच्या भेटीदरम्यान दावा केला की, भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही.
भारताने ट्रम्प यांच्या दाव्यावर काय प्रतिक्रिया दिली?
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्रम्प यांचे सर्व दावे फेटाळले. मोदी आणि ट्रम्प यांच्यात तेल खरेदीच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. हल्लीच्या दिवसांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीवरही संपर्क झालेला नाही, त्यामुळे अशा आश्वासनाचा प्रश्नच येत नाही, असे ठामपणे सांगण्यात आले.
ट्रम्प यांची भारत-रशिया तेल व्यवहारावर हरकत का?
ट्रम्प यांच्या मते, भारत आणि चीनसारखे देश रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने मॉस्कोला युक्रेन युद्धासाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे.