HR कडून स्वत:च्याच कंपनीला 18 कोटींचा गंडा! 22 Fake Employees दाखवून...

Salary Fraud : मॅनेजरनं कशी केली कंपनीची फसवणूक... आठ वर्षांनंतर प्रकरण समोर आलं तर कळला 18 कोटींचा गंडा

दिक्षा पाटील | Updated: Mar 13, 2025, 03:30 PM IST
HR कडून स्वत:च्याच कंपनीला 18 कोटींचा गंडा! 22 Fake Employees दाखवून...
(Photo Credit : Freepik)

Salary Fraud : कोणतीही कंपनी असली तरी त्यांच्यासाठी त्यांची एचआर पॉलिसी ही फार महत्त्वाची असते. कारण यामुळेच कर्मचारी हे त्या कंपनीत काम करायचं की नाही आणि त्यासोबत त्यांचा पगार आणि इचर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर यातही एचआर पॉलिसीमध्ये काही चूक असेल तर त्याचा परिणाम हा फक्त कर्मचाऱ्यांवर होत नाही तर त्यासोबत कंपनीवर देखील होतो. त्यामुळे सिस्टम ही कर्मचाऱ्यांसोबत ट्रान्सपरंसी ठेवण्याचा कंपनीकडून सतत प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं, कारण असं नसलं तर त्याचा त्या दोघांवर परिणाम होऊ शकतो. आता हे सगळं ठेवण्याचा प्रयत्न कोण करतं तर दुसरी-तिसरी व्यक्ती नसून ते एचआर करते. एचआर मॅनेजरनं खोटे कर्मचारी दाखवत कोट्यावधींचा गैरव्यवहार केल्याची माहिती समोर आलेली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

चीनच्या एका कंपनीमध्ये हा प्रकार घडला आहे. याविषयी साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्ट्सनुसार, तिथले मॅनेजरनं कंपनीच्या कोट्यावधींच्या रुपयांची फसवणूक केली आहे. या मॅनेजरचं नाव यांग असं आहे. ही कंपनी शांघायमध्ये लेबर सर्व्हिस कंपनीत काम करणाऱ्या या मॅनेजरनं कागदपत्रांमध्ये खोटे 22 कर्मचारी दाखवले. इतकंच नाही तर त्यांच्या पगाराच्या आणि रिटार्यमेंटच्या नावावर 16 मिलियन युआर म्हणजेच जवळपास 18 कोटी रुपयांची फसवणूक केली. 

नेमकं काय घडलं? 

यांग याच्या एक गोष्ट लक्षात आली की त्याला कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याचा आणि त्यांना किती पगार द्यायचा या सगळ्या गोष्टी त्याच्या हातात आहे हे त्याच्या लक्षात आलं. आता याचा आपण फायदा घेऊ शकतो हे लक्षात येताच त्यानं सगळ्यात आझी एक बनावट कर्मचाऱ्याचा रेकॉर्ड तयार केला आणि त्याचा पगार मंजूर करून घेतला. हा पगार यांगच्या नियंत्रणाखाली असलेल्या पण त्याच्या नावावर नसलेल्या बॅंक खात्यात ट्रान्सफर करण्यात आला. त्यानंतर लेबर सर्व्हिस कंपनीने सनच्या खात्यात पैसे का पोहोचले नाहीत याची चौकशी केली, तेव्हा यांगनं टेक कंपनीनं पैसे देणं थांबवल्याचं निमित्त केलं. 

दरम्यान, यांग इथेच थांबला नाही तर त्यानं 2014 ते 2022 पर्यंत यांगनं असे 22 बनावट कर्मचारी बनवले आणि त्या सगळ्यांच्या भत्त्यांच्या नावाखाली पैसे काढत होता. त्यानंतर अखेर, 2022 मध्ये टेक कंपनीच्या वित्त विभागाच्या काही कारणांमुळे ही गोष्ट लक्षात आली की 'सन' नावाच्या कर्मचारी हा ऑफिसमध्ये 100 टक्के उपस्थित होता पण तो कधीही कार्यालयात दिसला नाही. जेव्हा या प्रकरणाची चौकशी करण्यात आली तेव्हा यांगनं तब्बल 8 वर्ष केलेली फसवणूक उघडकीस आली. 

हेही वाचा : घरगुती हिंसाचार अन् फसवणुकीचा पतीचा अभिनेत्रीवर आरोप; मौन सोडत ती म्हणाली, 'माझं तर...'

या चौकशीत हे सगळे बॅंक व्यवहार समोर आले आणि यांगला 10 वर्षे आणि 2 महिने जेलची शिक्षा सुनावण्यात आली. इतकंच नाही तर त्याचे सगळे अधिकार एका वर्षासाठी काढून घेण्यात आले आणि त्याला मोठा दंड भरण्याचा आदेश दिला. न्यायालयानं 1.1 मिलियन युआन म्हणजेच जवळपास 1.5 कोटी परत करण्यास सांगितले. या सगळ्या घटनेनंतर कंपनीचं कर्मचाऱ्यांवर आणि लोकं काय करतात याकडे लक्ष नाही हे दिसून आलं. 

About the Author