Viral Photos : अवकाश आणि अवकाशाशी संबंधित अनेक संकल्पना मागील काही वर्षांमध्ये तुलनेनं जास्त प्रमाणात सामान्यांमध्येही चर्चेचा विषय ठरताना दिसल्या. परग्रहावर वावरणाऱ्या एलियनसंदर्भातील सिद्धांत असो किंवा अवकाशातील तबकडी असो. या गोष्टी काल्पनिक आहेत, की विज्ञानाचे सिद्धांत त्यांना प्रत्यक्षातील अस्तित्व देऊन जात आहेत? असे प्रश्न बऱ्याच जणांना पडतात. नासा, इस्रो आणि जगातील यासारख्या अंतराळसंशोधन संस्था या सर्व गोष्टींबाबतच्या कुतूहलाला त्यांच्या नवनवीन संशोधनातून वाव देत आहेत.
अंतराळाशी संबंधित अशीच एक अनपेक्षित गोष्टी नुकतीच युरोपात घडली, ज्यामुळं संपूर्ण युरोपमध्ये खळबळ माजली. युरोपातील आकाशात नुकताच एक तबकडीवजा आकार पाहायला मिळाला. एखादी वर्तुळाकार किंवा त्यासम आकार असणाऱी वस्तू वेगानं फिरत असल्यास ती कशी दिसेल, अगदी तसाच काहीसा आकार युरोपातील आकाशात रात्रीच्या अंधारात अगदी स्पष्टपणे दिसला. प्रथमदर्शनी ही तबकडी म्हणजे एलियनचं स्पेसशिपच आहे असंच अनेकांना वाटलं आणि त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.
नागरिकांमध्ये होणारी चिंता आणि काहीसं भीतीचं वातावरण पाहता अखेर हवामान अभ्यासक आणि संशोधकांनी या गुपितावरून पडदा उचलला. हे स्पेसशिप नसून एलॉन मस्कच्या SpaceX कंपनीच्या रॉकेटमधील इंधन ढगांमध्ये पडून ते गोठल्यामुळं म्हणजे फ्रोजन फ्यूलमुळं हा आकार तयार झाला होता.
We've received many reports of an illuminated swirl in the sky this evening
This is likely to be caused by the SpaceX Falcon 9 rocket, launched earlier today. The rocket's frozen exhaust plume appears to be spinning in the atmosphere and reflecting the sunlight, causing it to… pic.twitter.com/4a9urgZceR
— Met Office (@metoffice) March 24, 2025
युनायटेड किंग्डमच्या वेधशाळेनं X च्या माध्यमातून माहिती देत याविषयीचे गैरसमज दूर केले. यामध्ये स्पेसएक्सच्या रॉकेटमधील इंधनामुळं ही आकृती तयार झाली असून, फ्लोरिडातील कॅप कॅनावेरल इथून या रॉकेटचं उड्डाण झाल्याचं सांगत नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही असं स्पष्ट केलं. एएफपीनं खगोलशास्त्रज्ञांचा हवाला देत युरोपात आकाश निरभ्र असल्यास जवळपास सर्वच ठिकाणी हे दृश्य पाहायला मिळालं असेल असंही सांगितलं.