US Attack Iran What Is Bunker Buster Bomb: इराण आणि इस्रायल संघर्ष 22 जून रोजी अधिक चिघळला आहे. इस्रायलचं समर्थन करणाऱ्या अमेरिकेने इराणवरील तीन अणुकेंद्रावर हवाई हल्ले केले. आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 2 आठवड्यांचा वेळ दिल्यानंतर 48 तासांमध्येच इराणला अमेरिकेने लक्ष्य केलं. या हल्ल्यामध्ये अणुबॉम्बनंतर सध्याच्या घडीला सर्वात घातक असलेले प्रत्येकी 14 हजार किलो विजनाचे 14 बॉम्ब अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रांवर टाकले. या हल्ल्याला अमेरिकेने 'ऑपरेशन मिडनाईट हॅमर' असं नाव दिलं आहे. या 'ऑपरेशन मिडनाईट हॅमर' कारवाईदरम्यान कसे हल्ले करण्यात आले आणि त्यामध्ये वापरण्यात आलेला 'बंकर बस्टर बॉम्ब' आहे तरी काय हे जाणून घेऊयात...
अमेरिकेने इराणच्या 3 अणुकेंद्रांवर हल्ला केला. नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो येथे अमेरिकेने हल्ला चढवला. तीन अणुकेंद्रांवर 125 हून अधिक विमानांच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 7 बी-2 बॉम्बर्ससहीत 125 जेट विमाने सहभागी झालेली. 13 हजार किलो वजनाचे 14 'बंकर बस्टर बॉम्ब' इराणमधील अणुकेंद्रांवर टाकण्यात आले. हे सर्व ऑपरेशन इराणच्या हवाई क्षेत्रात शिरल्यापासून अवघ्या 25 मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात आलं. अमेरिकी बॉम्बर्सने पाश्चिमात्य वेळेनुसार सायंकाळी 6.40 वाजता (भारतीय वेळनुसार पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी) नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो या अणुकेंद्रांवर बॉम्ब टाकले.
7 वाजून 5 मिनिटांनी अवघ्या 25 मिनिटांमध्ये अमेरिकेची विमानं इराणच्या हवाई क्षेत्राच्या बाहेर पुडली. जनरल डॅन केन यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने या संपूर्ण कारवाईदरम्यान कोणताही प्रतिहल्ला केला नाही. त्यांना कदाचित आमची विमानं दिसलीच नाहीत, असं अमेरिकेने म्हटलं आहे. अमेरिकेने इराणविरुद्ध पहिल्यांदाच अशाप्रकारे युद्धसाहित्याचा वापर केला आहे. फोर्डोवर 'बंकर बस्टर बॉम्ब' टाकण्यात आले. हे बॉम्ब नेमके आहेत कसे ते कोणी बनवलेत त्यांची क्षमता किती हे पाहूयात...
अमेरिकेकडून जीबीयू-57A/B (GBU-57A/B) मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर (MOP) बंकर बस्टर बॉम्बचा वापर या हल्ल्यात केला आहे. फोर्डो अणुकेंद्रावर हे बॉम्ब टाकण्यात आले. जीबीयू-57A/B मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर नावाच्या अनोख्या बॉम्बेची रचना विमान बनवणाऱ्या बोईंग कंपनीनेच केली आहे. अमेरिकी हवाई दलाच्या मदतीने हा बॉम्ब तयार करण्यात आला आहे. हा अमेरिकन हवाई दलाचा सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर बॉम्ब असल्याचे सांगितले जाते. जीपीएसच्या मदतीने टार्गेटचा वेध घेणारा हा बॉम्ब खास जमिनीखाली असणारे शत्रूचे बंकर नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. या खास बॉम्बच्या डिझाइनवर सन 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच काम सुरू झालं होतं. सुरुवातीला, नॉर्थ्रोप ग्रुमन आणि लॉकहीड मार्टिन यांनी एक संयुक्त उपक्रमाअंतर्गत या बॉम्बसंदर्भात काम केलं. मात्र नंतर आर्थिक अडचणी आणि तांत्रिक अडचणींमुळे त्यांनी हा प्रकल्प अर्ध्यात सोडून दिला. नंतर तो इराक हल्ल्याच्यावेळी संशोधन पूर्ण करुन वापरण्यात आला.
2003 मध्ये अमेरिकेने सद्दाम हुसैन यांची हुकूमशाही नष्ट करण्याच्या इराद्याने इराकवर केलेल्या आक्रमणानंतर अमेरिकेला पुन्हा या बंकर बस्टर बॉम्ब निर्मितीच्या प्रकल्पात नव्याने हुरुप आला. अमेरिकी लष्कराचे त्यावेळी वापरले जाणारा बंकर नष्ट करणारे बॉम्ब अपेक्षेनुसार कामगिरी करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अर्ध्यात सोडलेल्या या प्रकल्पाकडून अमेरिकेला पुन्हा आशा निर्माण झाली. डिफेन्स थ्रेट रिडक्शन एजन्सी (डीटीआरए) अंतर्गत हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला. 'डीटीआरए'ने एअर फोर्स रिसर्च लॅबोरेटरीसोबत संयुक्तपणे काम करत 2004 साली या बॉम्बसंदर्भातील चाचण्या सुरु केल्या. जीबीयू-57A/B ची पहिली नियंत्रित स्फोट चाचणी 2007 मध्ये करण्यात आली. न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँड्स मिसाईल रेंजमध्ये या बॉम्बची चाचणी घेण्यात आली. दरम्यान, बोईंगने या बॉम्बला विमानामध्ये इंटीग्रेट करण्याचं टेंडर मिळवलं होतं. 2008 ते 2010 पर्यंत, B-52 आणि B-2 बॉम्बरमधून वारंवार हा बॉम्ब टाकण्यात आलेला. 2011 मध्ये, हा प्रकल्प अमेरिकन हवाई दलाकडे सोपवण्यात आला.
जीबीयू-57A/B मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर बॉम्बचे वजन सुमारे 14 हजार किलोग्रॅम इतकं आहे. म्हणजेच या बॉम्बचे एकूण वजन एकत्रितपणे दोन आफ्रिकन हत्तींच्या वजनाइतके आहे. हा बॉम्ब सुमारे 20.5 फूट लांबीचा आहे. या बॉम्बचा व्यास 31.5 इंच आहे. या बॉम्बचे वॉरहेड एएफएक्स-757 आणि पीबीएक्सएन-114 स्फोटकांच्या मिश्रणाचे वजन सुमारे अडीच हजार किलोग्रॅम इतके आहे. ही सर्व रचना एका विशेष उच्च-कार्यक्षमता असलेल्या स्टील मिश्रधातूपासून बनलेली आहे. बॉम्बच्या क्षमतेबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. काही अहवालांमध्ये असे म्हटले आहे की एमओपी 200 फूट काँक्रीटमध्ये हा बॉम्ब सहज प्रवेश करू शकतो. इतरांचे म्हणणे आहे की ते 5 हजार पीएसआयएमच्या ताकदीसह सुमारे 60 मीटर कडक काँक्रीट, तसेच 40 मीटर कठीण खडकात शिरु शकतो. 10 हजार पीएसआयएम ताकदीसह आठ मीटर कडक काँक्रीटमध्ये हा बॉम्ब सहज प्रवेश करून नुकसान घडवण्याची क्षमता असलेला आहे.
फोर्डो युरेनियम इनरिचमेंट प्रकल्पाचं अधिकृत नाव शाहिद अली मोहम्मदी अणू सुविधा असं आहे. ही इराणमधील एक भूमिगत युरेनियम इनरिचमेंट सुविधा आहे. हे केंद्र इराणमधील कोम शहरापासून 30 किलोमीटर उत्तरेला आहे. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स तळावरच हे केंद्र स्थित आहे. ही जागा इराणच्या अणुऊर्जा संघटनेच्या (AEOI) नियंत्रणाखाली आहे. ही दुसरी इराणी युरेनियम इनरिचमेंट सुविधा आहे. याशिवाय नतान्झ अणु सुविधेतही युरेनियम इनरिचमेंट केलं जातं. 13 जून 2025 रोजी या सुविधेवर इस्रायली हवाई दलाने हल्ला केला आणि 22 जून रोजी अमेरिकेच्या सैन्याने त्यावर हल्ला केला, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की या केंद्राचा 'नाश' करण्यात आला आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
MAS
(20 ov) 140/7
|
VS |
BRN
106(18.5 ov)
|
| Malaysia beat Bahrain by 34 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 253/7
|
VS |
ENG
246/7(20 ov)
|
| India beat England by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 169/8
|
VS |
NZ
173/1(12.5 ov)
|
| New Zealand beat South Africa by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.