Love Story : वारंवार सासरी येत होता जावई; त्या व्यक्तीसाठी त्याने प्रेग्नेट बायकोला...

एका पुरुषाने त्याचा आयुष्यातील नातेसंबंधातील गोंधळाबद्दल ऑनलाइन शेअर केलंय. त्याने सांगितलेले कहाणी ऐकून तुम्हाला धक्का बसेल.   

नेहा चौधरी | Updated: Oct 7, 2025, 09:24 PM IST
Love Story : वारंवार सासरी येत होता जावई; त्या व्यक्तीसाठी त्याने प्रेग्नेट बायकोला...

प्रेम आणि लग्नातील गुंतागुंत कधीकधी कल्पनेच्या पलीकडे जाईल हे सांगता येत नाही. एका विवाहित पुरूषाने गुप्तपणे सोशल मीडियावर अशीच एक धक्कादायक कहाणी नेटकऱ्यांसोबत शेअर केली आहे. ही कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्याने सोशल मीडियावर शेअर केलं आहे की, त्या व्यक्तीसाठी त्याने प्रेग्नेट बायकोची फसवणूक केली आहे. 
त्याने ही फसवणूक दुसऱ्या महिलेसाठी नाही तर त्याच्या सासऱ्यासोबतच्या नात्यामुळे दिली. 

Add Zee News as a Preferred Source

या व्यक्तीने त्याची चूक ऑनलाइन उघड केली असून त्याने पोस्टमध्ये सांगितलं की, त्याची पत्नी गर्भवती असताना तो त्याच्या सासरी वारंवार जात होतो. त्याने किसा रुमाह तंगा या फेसबुक पेजवर याच्या अफेयरबद्दल सांगितलं आहे. त्याने नंतर ही पोस्ट नंतर डिलिट केली आहे. पण ती रेडिटवर शेअर करण्यात आली आहे. ज्यामुळे ही पोस्ट आज लाखो लोकांपर्यंत पोहोचली आहे. त्याने सांगितलं नेमकं काय सांगितलं पाहूयात. 

काय सांगितलं आहे त्याने पोस्टमध्ये?

त्या माणसाने त्याच्या पोस्टमध्ये स्पष्ट केलंय की त्याच्या पत्नीने नुकताच मुलाला जन्म दिलाय. बायको गर्भवती असल्याने तिला माहेरी तिच्या पालकांच्या घरी राहिला पाठवलं होतं. अशात सासरहून त्याला फोन आला, की बायको माहेरी आली आहे तर तू पण इथे राहिला ये आणि ते घर स्वच्छ करुन भाडेकरूंना दे. त्यांचा सल्ला त्याला योग्य वाटला म्हणून तो सासरी राहिला गेला. 

घरातील काम करत असताना, मला गरम झालं म्हणून मी शर्ट काढला. त्यावेळी सासरे जवळ आले आणि ते म्हणाले की, तू सेक्सी दिसतोय. मग अचानक तो त्याला स्पर्श करु लागला अन् क्षणात नको ते घडलं. पुढे आमचं शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. पुढे त्याचे सासऱ्यासोबत तीन वेळा शारीरिक संबंध झाले. तो व्यक्ती पोस्टमध्ये पुढे म्हणाला की, मी माझ्या सासऱ्यांच्या प्रलोभनाला रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण तो पाच महिन्यांच्या दडपलेल्या इच्छेला बळी पडला."

व्यक्तीने पोस्टमध्ये लिहिलंय की, त्याच्या पत्नीच्या गरोदरपणामुळे आणि बाळंतपणामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात अंतर निर्माण झालं होतं, कदाचित त्यामुळे त्याच्या सासऱ्याचा प्रलोभनाला मी बळी ठरलो.  सेक्स केल्यानंतर, त्या व्यक्तीने त्याच्या सासऱ्यांना विचारलं की हे सामान्य आहे का? सासरे हसले आणि म्हणाले, "अपराधी वाटू नका, हे अगदी सामान्य आहे." पण आता त्याचे सासरे चौथ्यांदा त्याच्याकडे शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. ज्यामुळे तो घाबरला आहे. त्याला भीती आहे की जर हे प्रकरण पसरले तर त्याला LGBTQ समुदायाचा भाग मानलं जाईल. जे त्याच्यासाठी सामाजिक कलंक असेल. पोस्टच्या शेवटी, त्याने नेटिझन्सना आवाहन केलं की, "आता माझं सासरं दुसरं सत्र मागत आहेत. मी हे कसे टाळू? कृपया सल्ला द्या." दरम्यान ही धक्कादायक कहाणी मलेशियातील व्यक्तीची आहे. 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More