ब्राझीलमध्ये फुटबॉल प्रशिक्षण केंद्रात आग, १० जणांचा मृत्यू

रिओमधील फ्लॅमेंगो फुटबॉल प्रशिक्षण केंद्रात लागलेल्या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. 

Updated: Feb 8, 2019, 05:25 PM IST
ब्राझीलमध्ये फुटबॉल प्रशिक्षण केंद्रात आग, १० जणांचा मृत्यू title=
Pic Courtesy : Reuters

ब्राझील : रिओमधील फ्लॅमेंगो फुटबॉल प्रशिक्षण केंद्रात अचानक आग लागली. या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

रियो डी जेनेरो फुटबॉल क्लब फ्लेमेंगोच्या प्रशिक्षण केंद्रात मोठी आग लागली. त्यावेळी फ्लॅमेंगो युवक संघाचे खेळाडू झोपलेले होते. त्यामुळे त्यांना आग लागल्याचे समजले नाही. त्यामुळे दहा मुले आगीचे बळी ठरलीत. मुले प्रशिक्षण केंद्रात झोपल्याची माहिती अग्निशामकच्या जवानांनी दिली. अग्निशामक डग्लस हेनॉट यांनी मुले प्रशिक्षण केंद्रात झोपली होती, असे 'ग्लोबो न्यूज'ला सांगितल्याची माहिती रॉयटर्सने दिली आहे.

शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे आग लागली असलण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.