खोदलं की नुसतं सोनच निघतंय! 'या' देशात दोन महिन्यात दुसऱ्यांदा सापडली सोन्याची मोठी खाण

अमेरिकेकडे जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा आहे. या यादीत चीन सहाव्या क्रमांकावर आहे.  चीनकडे 2,264 टन सोन्याचा साठा आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 21, 2025, 06:16 PM IST
खोदलं की नुसतं सोनच निघतंय! 'या' देशात दोन महिन्यात दुसऱ्यांदा सापडली सोन्याची मोठी खाण

Gold Discovery in China : जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा अमेरिकेकडे आहे. मात्र, लवकरच चीन अमेरिसह बरोबरी करणार आहे. चीनमध्ये दोन महिन्यात दुसऱ्यांदा सोन्याची मोठी खाण सापडली आहे. चीनमध्ये नव्याने सापडलेला सोन्याचा साठा 168 टनांवर पोहोचला आहे. हा सोन्याचा खजिना चीनचे अर्थव्यवस्थेला बळ देणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

नोव्हेंबर 2024 मध्ये  चीनमध्ये  पृथ्वीवरील सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली (World’s largest gold reserve) . चीनमध्ये सापडलेला हा सोन्याचा साठा पाहून  अमेरिकेसारखा गडगंज देशही हडबडला. चीनमधील पिंग्झियांग काउंटी येथे ही सोन्याची खाण सापडली होती.  हुनान प्रांताच्या जिओलॉजिकल ब्युरोने सोन्याची खाण सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा होता. इतकचं नव्हे तर  चीनच्या सरकारी माध्यमांनी देखील याची पुष्टी केली होती. 

चीनमधील पिंग्झियांग काउंटी येथे जमिनीखाली  40 गोल्डन व्हेन अर्थात सोन्याच्या धारा सापडल्या होत्या. हा संपूर्ण साठा एकत्र केला तर या ठिकाणी सुमारे 1,000 मेट्रिक टन उच्च दर्जाच्या खनिजाचा साठा आहे. या सोन्याच्या खाणीचे मूल्य 600 अब्ज युआन म्हणजेच भारतीय चलनात जवळपास 6 लाख 76 हजार कोटी रुपये इतकी वर्तण्यात आले. हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा असू शकते असा दावा करण्यात आला. कारण दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण डीप माइनमध्ये 930 पेक्षा जास्त मेट्रिक टन सोनं सापडले होते. 

यानंतर नविन वर्षता पुन्हा एकदा चीनमध्ये सोन्याची मोठी खाण सापडली आहे. भूवैज्ञानिक सर्वेक्षणात उत्तर-पश्चिम चीनमधील गान्सू प्रांत, उत्तर चीनमधील इनर मंगोलिया स्वायत्त प्रदेश आणि ईशान्य चीनच्या हेलोंगजियांग प्रांतात सोन्याचा साठा आढळून आला आहे. चीनी वेबसाइट ग्लोबल टाईम्सने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे. नव्याने सापडलेल्या सोन्याच्या संसाधनांची एकूण रक्कम 168 टन असल्याचे सांगण्यात आले आहे. गांसूमध्ये सर्वाधिक 102.4 टन सोने सापडले आहे. चीनच्या  नैसर्गिक संसाधन मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे. 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More