Golkonda Blue Diamond : भारताच्या इतिहासातील अनेक गोष्टी आहेत ज्याविषयी अनेकांना माहित नाही. असाच काहीसा इतिहास हा समोर आला आहे. भारताच्या इतिहासाची संबंधीत अशी एक खास गोष्ट समोर आली आहे. तो म्हणजे अतिशय खास आणि दुर्मिळ निळा हिरा (द गोलकोंडा ब्लू). आता पहिल्यांदाच लिलावासाठी सादर करणार आहे. 14 मे रोजी स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे क्रिस्टीजन आयोजित करण्यात आलेल्या 'मॅग्निफिसेंट ज्वेल्स' नावाच्या लिलावात या ऐतिहासिक हिऱ्याचा समावेश करण्यात येणार आहे. हा हिरा एकेकाळी इंदूर आणि बडोद्याच्या राजघराण्यांचा अभिमान होता.
‘गोलकोंडा ब्लू’ नावाचा हा निळा हिरा भारतातल्या तेलंगणामधल्या गोलकोंडा खाणींतून सापडलेला आहे. तो खूप जुना, सुंदर आणि दुर्मिळ असा आहे. त्याचं वजन आहे 23.24 कॅरेट आणि त्याची किंमत जवळपास 300 ते 430 कोटी असण्याची शक्यता आहे.
हा हिरा एकेकाळी इंदूर आणि बडोदाच्या महाराजांकडे होता. 1920-30 च्या काळात इंदूरचे महाराज यशवंतराव होळकर यांनी हा हिरा एका कड्यात बसवून घेतला होता. त्यानंतर त्या हिऱ्याचा हार बनवण्यात आला आणि तो हार इतका सुंदर होता की फ्रान्सच्या एका चित्रकाराने महाराणीचं जे चित्र काढलं आणि त्यात हा हार दाखवला.
भारत स्वतंत्र होण्याच्या आधीच 1947 मध्ये हा हिरा न्यू यॉर्कमधील प्रसिद्ध जौहरी हॅरी विंस्टन यांनी खरेदी केला. त्यानंतर त्यांनी तो बडोदाच्या महाराजांना विकला. त्यामुळे तो पुन्हा एका भारतीय राजघराण्याचा भाग बनला.
14 मे 2025 रोजी हा हिरा स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा शहरात एक मोठ्या लिलावात विक्रीसाठी ठेवला जाणार आहे. हा लिलाव क्रिस्टी नावाच्या कंपनीकडून होणार आहे. त्यांनीच ‘कोहिनूर’सारखे इतर प्रसिद्ध हिरेही कधी काळी विकले आहेत.
हेही वाचा : दुखापतग्रस्त पत्नी, तुटलेली सीट आणि प्रचंड मनस्ताप...; Air India वर वीर दासची संतप्त पोस्ट
हा हिरा म्हणजे केवळ दागिना नाही, तर तो आपल्या देशाच्या इतिहासाचा, राजघराण्यांच्या संपत्तीचा आणि सुंदरतेचा एक भाग आहे. तो पुन्हा जगासमोर येत आहे.