जीवापुढे पैसा काहीच नाही, दुबई, अबुधाबीमधील श्रीमंत लोकांच्या पायाखालची जमीन सरकली; विमानतळ बंद, देशाबाहेर पडण्याचा एकच मार्ग

इराणने आखाती देशांवर हल्ले केले आहेत. , दुबई, अबुधाबीमधील श्रीमंत लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. देश सोडून जाण्यासाठी श्रीमंत लोक वाट्टेल तितका पैसा देण्यास तयार आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Mar 3, 2026, 04:25 PM IST
जीवापुढे पैसा काहीच नाही, दुबई, अबुधाबीमधील श्रीमंत लोकांच्या पायाखालची जमीन सरकली; विमानतळ बंद, देशाबाहेर पडण्याचा एकच मार्ग

Gulf tensions riyadh evacuation iran attacks dubai : जीवापुढे पैसा काहीच नाही... याचा प्रत्यक्षात अनुभव सध्या आखाती देशांमधील श्रीमंत लोक घेत आहेत. इराणने आखाती देशांवर केलेल्या हल्ल्यांमुळे या प्रदेशात तणाव वाढला आहे. इराणच्या हल्ल्यामुळे श्रीमंत आणि प्रभावशाली लोक  दुबई, अबुधाबीमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. लोक रियाधमधून बाहेर पडत आहेत, विशेषतः किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ. अनेक देशांमधील विमानतळ बंद झाले आहेत, ज्यामुळे रियाध हाच एक पर्यायी मार्ग राहिला आहे.

Add Zee News as a Preferred Source

इराणने अनेक आखाती देशांवर हल्ले केले आहेत.  ज्यामुळे इराण आणि युएई, कतार, बहरीन आणि सौदी अरेबियासह इतर देशांमधील तणाव वाढला. लोक भितीने तणावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. वाढत्या तणावादरम्यान रियाध हे एक प्रमुख निर्वासन केंद्र बनले आहे.

सौदी अरेबियातील रियाध मध्ये श्रीमंतांची गर्दी

सेमाफोरच्या एका अहवालानुसार, सौदी अरेबियातील रियाध हे श्रीमंत व्यक्ती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आखाती प्रदेश सोडण्याचे एक प्रमुख केंद्र बनले आहे. रियाध आता लोकांसाठी मुख्य निर्गमन बिंदू बनले आहे, लोक तेथे प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात. सौदीच्या राजधानीतील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आखाती देशातील काही प्रमुख विमानतळांपैकी एक आहे जे अजूनही सामान्यपणे कार्यरत आहे.

लोक रियाध का सोडत आहेत?

अनेक देशांमध्ये हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे लोक अडकून पडले आहेत. मोठ्या रकमेचा खर्च परवडणारे अधिकारी आणि श्रीमंत व्यक्ती रियाधला रस्त्याने प्रवास करत आहेत. काही जण दुबईहून 10 तासांचा प्रवास करून या प्रदेशातून खाजगी किंवा व्यावसायिक विमाने पकडत आहेत. सेमाफोर या खाजगी सुरक्षा आणि लक्झरी इव्हॅक्युएशन कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खाजगी सुरक्षा कंपन्या ग्राहकांना रियाधला सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी मोठ्या एसयूव्हीची व्यवस्था करत आहेत. तिथे पोहोचल्यानंतर, त्यांच्या वाहतुकीसाठी चार्टर्ड विमानांची व्यवस्था केली जाते.

आखाती देशांमधून कोण पळ काढत आहे?

आपला जीव वाचवण्यासाठी सर्वच जण आखाती देशांमधून कोण पळ काढत आहेत. जागतिक वित्तीय संस्थेचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी,  श्रीमंत लोक  बाहेर पडण्यासाठी हेल तेवढे पैसे देण्यास तयार आहेत.  युद्धामुळे विमानांच्या अचानक मागणीमुळे ही किंमत वाढली आहे. विमान प्रायव्हेटचे सीईओ अमीर नारान यांनी सेमाफोरला सांगितले की, आखात सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी रियाध हा सध्या एकमेव वास्तववादी पर्याय आहे. रियाध ते युरोपला जाणारे खाजगी जेट चार्टर आता 3.2 कोटी इतके महाग झाले आहेत.

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More