Space Romance: अंतराळात करा रोमान्स आणि सेक्स; स्पेस रॉकेटचे बुकींग सुरु

Space Romance: अलिकडच्या काळात हवाई प्रवासादरम्यान रोमान्सची क्रेज वाढली आहे. यामुळे अशा प्रकारचा अनुभव घेणाऱ्यांसाठी रोमॅंटिक स्पेस टूर निश्चितच मोठी पर्वणी ठरणार आहे. 

Updated: Apr 2, 2023, 11:07 PM IST
Space Romance: अंतराळात करा रोमान्स आणि सेक्स; स्पेस रॉकेटचे बुकींग सुरु  title=

Space Romance: प्रेमात माणूस वेगवेगळ्या कल्पना करतो. सात समुद्र पार ते अगदी चंद्र ताऱ्यांची सफर मात्र, लवकरच या सर्व कल्पना सत्यात उतरणार आहेत. लवकर प्रियकर आपल्याला प्रेयसीला घेवून अंतराळात रोमान्स करणार आहे. इतकचं नाही तर त्यांना अंतराळात सेक्स करण्याचा अनुभव घेता येणार आहे (Space Romance). 

NASA एका विशेष मोहिमेवर काम करत आहे. या मोहिमेला 68 Mile High Club असे नाव देण्यात आले आहे. विमान अनेक जण इंटिमेट होतात. हाच अनुभव आता थेट अंतराळात घेता येणार आहे. नासाचे अंतराळवीर जोस हर्नांडेझ यांनी स्पेस रोमान्स प्रकल्पाची माहिती दिली. 

हौसेला मोल नाही

या रोमॅंटिक स्पेस टूरचे बुकींगही सुरु झाले आहे. या साठी प्रत्येकी 3 कोटी 75 लाख रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे. म्हणजेच एका जोडपल्याला 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करावे लागेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षाच्या अखेरीस नासाची सर्व तयारी पूर्ण होईल. अंतराळात रोमान्स करणे किंवा सेक्स करणे अजिबात बेकायदेशीर ठरणार नाही. 

हवाई प्रवासादरम्यान रोमान्सची क्रेज वाढली

अलिकडच्या काळात हवाई प्रवासादरम्यान रोमान्सची क्रेज वाढली आहे. यामुळे अशा प्रकारचा अनुभव घेणाऱ्यांसाठी रोमॅंटिक स्पेस टूर निश्चितच मोठी पर्वणी ठरणार आहे. 

चंद्राची सफारी

अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या विरोधाला न जुमानता  यासुका मीजावा यांनी स्पेस टूरची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प केला आहे. Elon Musk यांची कंपनी SpaceX रॉकेट द्वारे ही चंद्राची सफर घडवली जाणार आहे. ही स्पेस टूर आठवडाभराची असणार आहे. या टूरची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.