गिझाच्या पिरॅमिडखाली 6500 फूट खोल आहे गुप्त शहर! आजपर्यंतचे सर्वात मोठे संशोधन, जगभरात खळबळ

गिझाच्या पिरॅमिडखाली रहस्यमयी शहर सापडले आहे. हे शहर गिझाच्या पिरॅमिडखाली 6500 फूट खोलीवर आहे. 

वनिता कांबळे | Updated: Mar 25, 2025, 10:57 PM IST
गिझाच्या पिरॅमिडखाली 6500 फूट खोल आहे गुप्त शहर! आजपर्यंतचे सर्वात मोठे संशोधन, जगभरात खळबळ

Giza Pyramids : गिझा पिरॅमिड हे जगातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक आहे. इथं संशोधन करताना प्रत्येकवेळस नविन रहस्य उघड होते. आता मात्र, संशोधकांनी जो दावा केला आहे त्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. गिझाच्या पिरॅमिडखाली 6500 फूट खोल एक गुप्त शहर असल्याचा दावा करण्यात आहे. या शहराची रचना देखील अत्यंत रहस्यमयी अशी आहे. जाणून घेऊया नेमकं काय आहे. 

इजिप्तच्या पिरॅमिड्सखाली एक 'अभूतपूर्व' शोध लागल्याचा दावा करण्यात आला जात आहे. या दाव्याने जगभरात खळबळ उडाली आहे. इटली आणि स्कॉटलंडमधील संशोधकांनी गिझाच्या पिरॅमिडखाली एक 'विशाल भूमिगत शहर' शोधल्याचा दावा केला आहे. 

गिझाच्या पिरॅमिड्सच्या खाली 6,500 फूटांपेक्षा जास्त खोलवर एक शहर आहे. यामुळेच  पिरॅमिड त्यांच्या वास्तविक उंचीपेक्षा 10 पट मोठे दिसतात. डेली मेल ऑनलाइनच्या वृत्तानुसार, इटलीच्या पिसा विद्यापीठाचे कोराडो मलांगा आणि स्कॉटलंडच्या स्ट्रॅथक्लाइड विद्यापीठाचे फिलिपो बिओंडी यांनी केलेल्या नवीन अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.  इटलीमध्ये एका खाजगी ब्रीफिंग दरम्यान या नव्या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. 

नविन संशोधनानुसार पिरॅमिडच्या खाली 2100 फूटांपेक्षा जास्त खोलीपर्यंत पसरलेल्या आठ उभ्या दंडगोलाकार रचना आणि 4000 फूट खोलीवर अज्ञात रचना सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.  ज्याप्रमाणे सोनार रडारचा वापर करुन समुद्राची खोली मोजली जातो त्याचप्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गिझाच्या पिरॅमिडखाली असलेल्या हा रहस्यमयी रचनेचे मॅपिंग करुन याची थ्री रचना करुन या गुप्त शहराची रचना कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

गिझामध्ये खुफू, खफ्रे आणि मेनकौरे असे तीन पिरॅमिड आहेत. जळपास 4500 वर्षांपूर्वी उत्तर इजिप्तमधील नाईल नदीच्या पश्चिम तीरावर एका खडकाळ पठारावर हे पिरॅमिड बांधण्यात आले. प्रत्येकी एका फारोच्या नावाने हे पिरॅमिड बांधले गेले.  
उत्तरेकडील पिरॅमिड हे  सर्वात जुने असून खुफूसाठी बांधले गेले होते. हे ग्रेट पिरॅमिड म्हणूनही ओळखले जाणारे. याचे बांधकाम सर्वात मोठे आहे. 480 फूट उंच आणि 750 फूट रुंद इतके भव्य आहे. मधला पिरॅमिड खाफ्रेसाठी बांधण्यात आला होता. मेनकौरे शेवटचा पिरॅमिड आहे. पिरॅमिड्सच्या खाली एक मोठे भूमिगत शहर सापडले असल्याचे या नवीन शोध प्रकल्पाच्या प्रवक्त्या निकोल सिकोलो यांनी सांगितले.