गरोदर महिलेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; कारण जाणून तुम्हालाही येईल राग

जगण्याची इच्छा उरत नाही तेव्हा तो आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो. 

Updated: Sep 18, 2021, 08:45 AM IST
गरोदर महिलेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; कारण  जाणून तुम्हालाही येईल राग

ब्राझीलिया : जेव्हा व्यक्ती त्रस्त होतो, त्याला जगण्याची इच्छा उरत नाही तेव्हा तो आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो. अशीचं एक घटना घडली आहे ब्राझीलमध्ये राहणाऱ्या महिलेसोबत. महिलेने चक्क दुसऱ्यामजल्यावरून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक गोष्ट म्हणजे गरोदर असताना महिलेने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. महिला आत्महत्या करण्यासाठी दुसऱ्या मजल्यवर आली तेव्हा पतीने तिला मागे खेचल. पण माहिने आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला? हे कारण कळालं तर तुम्हाला देखील राग येईल.

'द सन'ने दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलच्या रिडो जी जनेरियो ज्या अपार्टमेन्टमध्ये राहते जेव्हा तिने आत्महच्या करण्याचं ठरवलं तेव्हा तेथील रहिवाश्यांना तिच्या ओरडण्याचा आवाज येत होता. दुसऱ्या मजल्यावरून ती उडी मारण्याचा प्रयत्न करत आहे. धक्कादायक चित्र पाहून आजू-बाजूच्या लोकांना मोठा धक्का बसला. लोकांना जास्त काही कळायच्या आधी महिलेच्या पतीने तिला घरात खेचले. 

त्यानंतर देखील घरातून ओरडण्याचा आवाज येत होता. याठिकाणी महिलेसोबत घरगुती हिंसा होत असल्याचा प्रकार सर्वांच्या लक्षात आला. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या महिलेने पोलिसांसोबत संपर्क साधला. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं. सध्या महिलेचा पती पोलिसांच्या ताब्यात आहे. 

महिलेने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती महिलेला घराबाहेर जावू देत नव्हता. त्यामुळे महिलेला नोकरी देखील गमवावी लागली. जेव्हा महिलेने मदतीसाठी एक नोट खडकी बाहेर फेकली. जेव्हा पतीला याबद्दल कळालं तेव्हा त्याने पत्नी गरोदर आहे याचा विचारही न करता पत्नीला मारहाण केली.