SEX POWER | आखाती देशातील राजकुमारांकडून लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी या हुबोरा पक्ष्यांची शिकार

पाकिस्तानने सौदी अरेबियाच्या राजघराण्याला हुबारो पक्ष्यांच्या शिकारीसाठी आमंत्रित केलेलं आहे, हुबारो पक्षी आंतरराष्ट्रीय संरक्षित प्रजातींच्या श्रेणीमध्ये येतात आणि त्यांची शिकार करण्यास मनाई आहे.

Updated: Apr 20, 2021, 09:03 PM IST
SEX POWER | आखाती देशातील राजकुमारांकडून लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी या हुबोरा पक्ष्यांची शिकार

यूएई : यूएईच्या राजघराण्यातील सदस्य पाकिस्तानात दाखल होतात. पाकिस्तानने सौदी अरेबियाच्या राजघराण्याला हुबारो पक्ष्यांच्या शिकारीसाठी आमंत्रित केलेलं आहे, हुबारो पक्षी आंतरराष्ट्रीय संरक्षित प्रजातींच्या श्रेणीमध्ये येतात आणि त्यांची शिकार करण्यास मनाई आहे. परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी प्रिंस मोहम्‍मद बिन सलमान यांच्या सोबतच संयुक्त अरब अमिरातीच्या राजकुमारांना देखील याची परवानगी दिली आहे.

लैंगिक शक्ती वाढविण्यासाठी हे राजकुमार या मुक्या पक्ष्यांना मारतात. यूएईच्या या राजकुमारांकडून हुबारो पक्ष्यांची शिकार केल्याबद्दल इमरान खान मोबदला आकारून आपली तिजोरी भरून घेत आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दुबईचा शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम, राजकुमार आणि राजघराण्यातील इतर सदस्यांना 2020 ते 2021 या काळात शिकार करण्यासाठी मंजूरी दिली आहे. सौदी अरेबियाच्या काही अब्ज डॉलरच्या कर्जाखाली दबलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना, आपल्या देशातील मुक्या प्राण्यांना मारण्याची परवानगी दिली आहे. तर हुबारो पक्ष्यांची शिकार करण्यासाठी राजघराण्यातील इतर दोन सदस्यांनाही मान्यता दिली आहे.

हुबारोची शिकार करा आणि लैंगिक शक्ती वाढवा- पाकिस्तानचं आमंत्रण

इम्रान खान सरकारने या आधी सौदीच्या प्रिन्सला शिकार करण्यासाठी परवानगी दिली होती, परंतु त्याने अजुनही त्याची फी भरलेली नाही. पाकिस्तानमध्ये ही पहिली वेळ नाही, जेव्हा या अरब देशांतील राजघराण्यातील लोकांना शिकारीसाठी आमंत्रण दिले गेले आहेत. हे गुप्त आणि खासगी प्रकारे शिकार करण्याचे काम गेल्या 4 दशकांपासून पाकिस्तानमध्ये सुरू आहे. गेल्या अनेक हजार वर्षांपासून अरब देशातील लोक हुबारो पक्ष्यांची शिकार करत आहेत आणि अजूनही या शिकारींच सत्र सुरु आहे.

हुबारो पासूम सौदीचे राजघराणे लैंगिक शक्ती वाढवतात तरी कशी?

खरेतर लोकांचा असा समज आहे की, हुबारो पक्ष्यांचे मांस खाल्याने लैंगिक शक्ती वाढते आणि म्हणूनच सौदी अरेबियाचे राजकुमार, त्यांचा शिकार करण्यासाठी पाकिस्तानात येतात. लैंगिक शक्ती वाढविण्यासाठी स्पॅनिश माश्यांचा देखील वापर केला जातो.

लैंगिक शक्तीवर्धक औषध म्हणून हुबारो पक्ष्यांची ओऴख

लैंगिक शक्तीवर्धक औषध म्हणून हुबारो पक्ष्यांची ओऴख प्राचिनकाळापासून आहे. हेच कारण आहे की, आखाती देशांमधील श्रीमंत लोक पाकिस्तानमध्ये भरपूर पैसे खर्च करतात आणि त्यांची लैंगिक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतात. हुबारो पक्षी दक्षिण आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिका येथे आढळतात. हे पक्षी थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी पाकिस्तानात येतात. काही पक्षी इराणमध्येही जातात. एका अंदाजानुसार येथे 42 हजार आशिया हुबारो आणि 22 हजार उत्तर आफ्रिकन हुबारो पक्षी जिवंत आहेत.

राजकुमार लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी हुबारोची शिकार करतात

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा इम्रान खान सत्तेत नव्हते, तेव्हा त्यांनी हुबारो पक्ष्यांची शिकार करण्यास विरोध दर्शविला होता आणि खैबर पख्‍तूनख्‍वा येथे त्यांनी पक्षाची शिकार करण्यास परवानगी दिली नव्हती, कारण तेथे त्यांच्या पार्टीची सत्ता होती. मात्र, आता इम्रान खान त्यांच्या निर्णयावर कायम नाही. या उलट त्यांनी या  सौदी अरेबियाच्या राजकुमारांना हुबारो पक्ष्यांची शिकार करण्यास परवानगी दिली आहे.

पाकिस्तानच्या कोर्टाची हुबारो शिकारीवर बंदी

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने सन 2015 मध्ये हुबारो पक्ष्यांच्या शिकारवर बंदी घातली होती. जेव्हा पाकिस्तानच्या न्यायालयाने हुबारो आणि गरुडाच्या निर्यातीवर आणि शिकारीवर बंदी घातली तेव्हा,  सौदी अरेबिया आणि युएईशी त्यांचे संबंध बिघडू लागले. त्यांच्या तणावाखाली पाकिस्तान सरकारला झुकावे लागले.

आखाती शेखांची लैंगिक शक्ती

आखाती शेखांची लैंगिक शक्ती वाढवून त्यांच्याकडून पैसे कमवण्याच्या इच्छेचा पुरेपूर फायदा पाकिस्तान सरकार घेतं. सौदी अरेबियाच्या प्रिन्स फहद बिन सुलतानने काही वर्षांपूर्वी 2000 हुबारो पक्ष्यांची शिकार केली आणि या गोष्टींमुळे त्याला जगभरातील मीडियाने विरोध दर्शवला. इतकेच नव्हे तर प्रिन्स फहदने गेल्या वर्षी हुबारो पक्ष्यांच्या शिकारसाठी लागणार्‍या एक लाख डॉलर्सची फी पाकिस्तान सरकारला दिलेली नाही.

शिकारीच्या परवानगीची फी २ अब्ज रुपये

गेल्या वर्षी 60 गरुड वापरण्यासाठी आकारण्यात आलेली 60 हजार डॉलर्सची फी प्रिन्स फहदने भरली नाही. प्रिन्स फहदला पाकिस्तानाने 1000 हुबारो पक्ष्यांची शिकार करण्याची परवानगी दिली होती, तरी त्यांने 2000 पक्ष्यांची शिकार केली. पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांत शिकारच्या सीझनमध्ये किमान 2 अब्ज रुपये कमावतो.