सुनिता विलियम्स करतात सरकारी नोकरी; पृथ्वीवर परतल्यानंतर नासाकडून मिळणार 'इतका' पैसा.... आकडा पाहाच

Sunita Williams Latest News : पृथ्वीवर परतण्याची तारीख तर ठरली, पण या संपूर्ण 9 महिन्यांसाठी किती आर्थिक मोबदला मिळणार? पाहा महत्त्वाची माहिती....  

सायली पाटील | Updated: Mar 18, 2025, 11:02 PM IST
सुनिता विलियम्स करतात सरकारी नोकरी; पृथ्वीवर परतल्यानंतर नासाकडून मिळणार 'इतका' पैसा.... आकडा पाहाच
Sunita Williams return journey latest update on salary

Sunita Williams Return To Earth News in Marathi: अवकाशात अडकलेल्या नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विलियम्स यांच्यासंदर्भात आता क्षणाक्षणाला महत्त्वाची माहिती समोर येण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल 9 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विलियम्स पृथ्वीवर परतण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. मंगळवारी 18 मार्च रोजी विलियम्स यांना पृथ्वीवर परत आणलं जाणार असून, बुच विल्मोर आणि त्यांचे दोन इतर अंतराळवीर सहकारीसुद्धा या मोहिमेअंतर्गत पृथ्वीवर पाऊल ठेवणार आहेत. 

नासाच्या माहितीनुसार बुधवारी पार पडणारी ही मोहिम आता मंगळवारी म्हणजेच एक दिवस आधी पार पडणार आहे. विलियम्स यांना माघारी आणण्यासाठीच्या मोहिमेवर साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं असतानाच आता विलियम्स यांना या मोहिमेतून नेमका किती आर्थिक फायदा/ मोबदला दिला जाणार हा प्रश्नसुद्धा अनेकांच्याच मनात घर करत आहे. 

नासाचेच माजी अंतराळयात्री कॅडी कोलमॅन यांच्या माहितीनुसार अंतराळयात्रींसाठी वाढीव तासांच्या कामासाठी दिल्या जाणाऱ्या मोबदल्याची कोणतीही तरतूद नाही. हे अंतराळवीर सरकारी कर्मचारी असल्यामुळं त्यांनी अवकाशात व्यतीत केलेला वेळ हा पृथ्वीवर काम करणाऱ्या कोणत्याही सामान्य सरकारी कर्मचाऱ्याच्या कार्यालयीन तासांइतकाच असल्यामुळं त्यांना एक दैनंदिन भत्ता मात्र लागू केला जाणार आहे. जी रक्कम असेल दर दिवसाचे $4 (जवळपास 347 रुपये). 

उदाहरणार्थ 2010-11 मध्ये अंतराळातील एका 159 दिवसांच्या मोहिमेदरम्यान कोलमॅन यांना जवळपास $636 (साधारण 55,000 रुपये) इतका आर्थिक मोबदला देण्यात आला होता. याच हिशोबानं पाहिल्यास बुच विल्मोर आणि विलियम्स यांना अवकाशात 287 दिवसांहून अधिक दिवसांचा कालावधी लागल्यानं त्यांना याबदल्यात $1148 (साधारण 1 लाख रुपये) इतकी किंवा याहून जास्त रक्कम दिली जाऊ शकते. 

हेसुद्धा वाचा : ... तर 5 वर्षात शासन तुमच्या जमिनी परत करणार; रस्ते, महामार्ग प्रकल्पांसाठीच्या भूखंड अधिग्रहण नियमात होणार बदल 

 

अमेरिकेतील तरतुदी आणि कायद्यांनुसार नासासाठी सेवेत असणाऱ्या विल्मोर आणि  विलियम्स यांना GS-15 या श्रेणीतील पगार लागू होतो. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या जनरल शेड्यूल सिस्टीममधील हा सर्वाधिक उच्चस्तर असल्याचं म्हटलं जातं. GS-15 या श्रेणीतील सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी 125133 डॉलर ते 162672 डॉलर (साधारण 1.08 कोटी से 1.41 कोटी रुपये) इतका पगार मिळतो. 

परिणामी या मोहिमेसाठी आता बुच आणि सुनिता यांना मिळणाऱ्या रकमेची बेरीज केल्यास त्यांचा पगार जवळपास $93,850 ते $122,004 (जवळपास 81 लाख रुपये ते 1.05 कोटी रुपये) इतका असून, यामध्ये 1148 डॉलर म्हणजेच 1 लाख रुपयांचा भत्ता जोडल्यास त्यांचा पगार 82 लाख ते 1.06 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असा तर्क लावला जात आहे.