लंडन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोलानल्ड ट्रम्प हे सोशल मीडिया त्यातही ट्विटरवर किती अॅक्टीव्ह असतातच हे आपण जाणताच. या 'ट्विटट्विटा'बद्धल दस्तुरखुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच एक मजेशीर माहिती दिली आहे. ट्रम्प सांगतात की, आपणास ट्विट करण्यासाठी स्थळ, वेळ, काळ याचे अजिबात बंधन नसते. कधी कधी तर आपण बेडवर पहूडल्या पहूडल्याच ट्विट करत असतो.


विविध कारणांसाठी ट्विटचा वापर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की, खूपच कमी वेळा असे होते की, माझ्या अकाऊंटवरून कोणीतरी दुसरा व्यक्ती ट्विट करतो. विरोधी पक्षांवर हल्ला चढवताना, सरकारने घेतलेल्या निर्णयांची, योजनांची माहिती देताना तसेच, शत्रूराष्ट्राला इशारावजा सल्ला देताना ट्रम्प ट्विटचा वापर करतात. 


फेक न्यूजच्या जमान्यात ट्विटरचा पर्याय छान


सोमवार सकाळपर्यंत ट्रम्प यांच्या @realDonaldTrump या ट्विटर अकाऊंटवर ४ कोटी ७२ लाखांहूनही अधिक फॉलोअर्स होते. इग्लंडच्या ITV चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर उपस्थितीचे जोरदार कौतूक केली. ट्रम्प यांनी असेही म्हटले की, 'फेक न्यूज'च्या जमान्यात मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्विटरची आवश्यकता आहे.


याच मुलाखतीत ट्रम्प पुढे म्हणाले, 'जर माझ्याजवळ संवाद साधण्यासाठी हा पर्याय नसता तर, बचाव करण्यासाठी माझ्याकडे माध्यमत नव्हते. मला अनेकदा खोट्या बातम्या मिळतात. ज्या अगदीच चुकीच्या असतात किंवा जाणीवपूर्वक पसरवल्या जातात.' 


बेडवरूनही करतो ट्विट- ट्रम्प


ट्रम्प असेही म्हणाले की, खरे तर ही फारच अजब गोष्ट आहे. पण, जगभरातील अनेक फॉलोअर्स माझे ट्विट येण्याची वाट पाहात असतात. बहुतांश वेळा मी स्वत:च ट्विट करतो. खूप कमी वेळा माझ्या अकाऊंटवरून दुसरेच कोणी ट्विट करते. अनेकदा तर मी बेडवर पहुडल्या पहुडल्याच ट्विट करतो. 


आपले वय ७१ असतानाही आपण बर्गर खाता, असे विचारले असता. ते म्हणाले, होय, मी याही वयात बर्गर खातो. तसेच, जगभरातील अनेक सुप्रसिद्ध शेफ्सच्या हातून बनवलेले उत्कृष्ट भोजन मी घेत असतो.