इस्लामाबाद : Imran Khan sold expensive gifts: पाकिस्तानची (Pakistan) आर्थिक स्थिती एकदम बिकट झाली आहे. ही अत्यंत वाईट अवस्था कोणापासून लपलेली नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधान इम्रान खान  (Imran Khan) यांना परदेशातून मिळालेल्या महागड्या भेटवस्तू विकून आपली झोली भरण्यात व्यस्त आहेत. पाकिस्तानमधील प्रमुख विरोधी पक्षांनी तसा आरोप केला आहे. इम्रान खान यांनी इतर देशांकडून मिळालेल्या भेटवस्तू बेकायदेशीरपणे विकल्या आहेत. यात त्यांनी 10 लाख किंमतीच्या महागड्या घड्याळाचा समावेश आहे. या आरोपावर इम्रान यांनी मौन बाळगले आहे.


इतक्या किंमतीची भेटवस्तू ठेवण्याची परवानगी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य प्रमुख आणि घटनात्मक पदांवर असलेले अधिकारी यांच्यात अधिकृत भेटींमध्ये भेटवस्तूंची देवाणघेवाण केली जाते. पाकिस्तानमधील गिफ्ट डिपॉझिटरी (तोशाखाना) नियमानुसार, या भेटवस्तू राष्ट्राची मालमत्ता आसतात, जोपर्यंत त्यांचा उघड लिलाव होत नाही. तथापि, नियम असेही सांगतात की अधिकारी 10,000 रुपयांपेक्षा कमी भेटवस्तू आपल्याकडे ठेवू शकतात. विरोधकांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांनी या नियमांचे उल्लंघन केले आहे.


मरियम नवाज यांनी ट्विट केले


पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाज (Maryam Nawaz) यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'इम्रान खान यांनी इतर देशांकडून मिळालेल्या भेटवस्तू विकल्या आहेत. खलिफा हजरत उमर (पैगंबर मुहम्मदचा साथीदार) यांनी आपली कमीज आणि लबादे यासाठी जबाबदार होते आणि एकीकडे आपण (इम्रान खान) तोषाखान्याच्या भेटवस्तू लुटल्या आणि तुम्ही मदिनासारखे राज्य स्थापन करण्याची चर्चा करता? एखादी व्यक्ती इतकी कशी काय असंवेदनशील असू शकते, बहिरी, मुकी आणि आंधळी कशी असू शकते?


इम्रान यांना प्रिन्सकडून मिळाले होते घड्याळ 


त्याचवेळी विरोधी आघाडी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटचे (PDM) प्रमुख मौलाना फजलूर रहमान म्हणाले की, पंतप्रधान इम्रान खान यांनी एका राजकुमाराकडून मिळाले महागडे घड्याळ विकल्याच्या बातम्या आहेत, जे लाजीरवाणे आहे. सोशल मीडियावर अशा बातम्या येत आहेत की इम्रान खान यांना एका आखाती देशाच्या राजपुत्राने दहा लाख अमेरिकन डॉलर किमतीचे घड्याळ भेट दिले होते. त्यांनी हे घड्याळ दुबईतील एका जवळच्या मित्राला 10 लाख डॉलरला विकले आणि पैसे आपल्याकडेच ठेवले. दरम्यान, या कथित विक्रीबाबत प्रिन्सलाही समजले आहे.