जर आमच्या देशावर हल्ला केला तर आम्ही तुमच्या देशात स्लीपर सेल दहशतवाद सुरु करु अशी धमकी इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिली होती. अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान तीन अणुकेंद्रांवर अचानक हल्ला करण्याच्या काही दिवस आधी हा संवाद साधण्यात आला होता. इराकवर हल्ला करत अमेरिकेने संघर्षात अधिकृतपणे प्रवेश केला आहे.
गेल्या आठवड्यात कॅनडामध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेत मध्यस्थाद्वारे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना हा संदेश देण्यात आला होता. डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परिषदेतून लवकर निघून गेले होते, असं वृत्त NBC ने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलं आहे. तथापि, अमेरिका किंवा संयुक्त राष्ट्रांमधील इराणी मिशनने या रिपोर्टवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
एका युरोपीय राजनयिकाचा हवाला देत या अहवालात पुढे म्हटलं आहे की, अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांचा असा विश्वास आहे की इराणकडे अमेरिकेच्या भूमीपलीकडे आणि मध्य पूर्वेच्या पलीकडे युरोपीय आणि अमेरिकन नागरिकांवर हल्ला करण्याची क्षमता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी पहाटे फोर्डो येथील प्रमुख भूमिगत युरेनियम समृद्धीकरण स्थळावर, इस्फहान आणि नतान्झ येथील अणु सुविधांवर अचानक हल्ले करण्याची घोषणा केल्यानंतर हा खुलासा झाला आहे.
दरम्यान, इराणने मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांना धमकी दिली आहे की, अमेरिकन सैनिक वापरत असलेल्या लष्करी तळांवर प्रत्युत्तर म्हणून हल्ला केला जाऊ शकतो.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासन आणि प्रमुख अमेरिकन शहरांमधील कायदा अंमलबजावणी संस्था सध्यया हाय-अलर्टवर असून संभाव्य उत्तर देण्यासाठी तयारीत आहेत. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी आणि लॉस एंजेलिसमधील पोलीस विभागांनी शहरातील धार्मिक, सांस्कृतिक आणि राजनैतिक स्थळांवर अतिरिक्त सैन्य तैनात करत असल्याचे सूचना जारी केल्या आहेत.
"इराण संघर्षामुळे अमेरिकेत धोक्याचे वातावरण निर्माण होत आहे," असा इशारा गृह विभागाने दिला आहे. अमेरिकेत दहशतवादी हल्ल्यांची शक्यता वाढू शकते अशी भितीही व्यक्त करण्यात आली आहे. जर इराणी नेतृत्वाने मातृभूमीतील लक्ष्यांविरुद्ध प्रत्युत्तरात्मक हिंसाचाराचे आवाहन करणारा धार्मिक आदेश जारी केला तर दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी भीती आहे.
तसंच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने परदेशात प्रवास करणाऱ्या किंवा राहणाऱ्या आपल्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा जारी केला आहे.
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 154/7
|
VS |
BRN
157/4(16.2 ov)
|
Bahrain beat Tanzania by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.