Iran US tension News : खळबळ! अमेरिका- इराणचं युद्ध सुरू? अरबी समुद्रातील 'या' कारवाईमुळं वाढली संपूर्ण जगाची चिंता

Iran US tension News : अरबी समुद्रात युद्धाची ठिकाणी? अमेरिकेकडून इराणला सडोतेड उत्तर. ट्रम्प यांच्या महासत्ता राष्ट्राच्या मनात आहे तरी काय? आताच्या क्षणाला जगाची चिंता वाढवणारी बातमी.   

सायली पाटील | Updated: Feb 4, 2026, 10:29 AM IST
Iran US tension News : खळबळ! अमेरिका- इराणचं युद्ध सुरू? अरबी समुद्रातील 'या' कारवाईमुळं वाढली संपूर्ण जगाची चिंता
Iran US tension America Iran War US military shot Iranian drone Arabian Sea latest news

Iran US tension News : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष (Donald Trump) डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील भूमिका आणखी कठोर केल्या असून या देशाला धडा शिकवण्यासाठी सातत्यानं अमेरिकी लष्कराची ताकद वाढवण्यावर डोनाल्ड ट्रम्प भर देताना दिसत आहेत. मध्यपूर्वेत अमेरिकेच्या लष्करी बळ वाढवण्यावर सातत्यानं भर दिला जात आहे. काही दिवसांपासून तांबड्या समुद्रापासून अरबी समुद्राच्या क्षेत्रात एक विचित्र अशी स्मशानशांतता पाहायला मिळाली. त्याचदरम्यान एक लक्षवेधी वृत्त समोर आलं ज्यानुसार अमेरिकेच्या तैनात असणाऱ्या लष्कराच्या दिशेनं येणारा इराणचा ड्रोन उद्ध्वस्त केला आणि या दोन्ही देशांमधील तणावात पुन्हा वाढ झाली. ज्यामुळं पुन्हा एकदा या भागात वातावरण तंग असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

वृत्तसंस्थेनं दिली घटनास्थळावरील माहिती, काय म्हटलं?

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार अमेरिकी लष्करानं अरबी समुद्रामध्ये अब्राहम लिंकन ही युद्धनौका तैनात केली असून याच युद्धनौकेनजीक येणारा इराणचा ड्रोन अमेरिकेनं हाणून पाडला. अमेरिकी नौदलाच्या या तळावर लढाऊ विमानं तैनात असून हा कोणताही सर्वसामान्य ड्रोन नव्हता. हा होता 'शाहेद 139' ड्रोन. 

प्राथमिक माहितीनुसार शाहेद अमेरिकी नौदलाच्या युद्धनौकेनजीक जात होतं. हा धोका ओळखत अमेरिकी लढाऊ विमान F 35 सक्रिय झालं आणि पापणी लवण्याच्या आतच शाहेदच्या चिंधड्या करण्यात आल्या. सदर कारवाईसंदर्भात अमेरिकी लष्कराचे प्रवक्ते कॅप्टन टीम हॉकिन्स यांच्या दाव्यानुसार लष्करानं मंगळवार (3 फेब्रुवारी 2026) रोजी एक इराणी ड्रोन पाडला. अतिशय संशयास्पद हालचालींसह हा ड्रोन अमेरिकी युद्धनौकेनजीक येण्याचा प्रयत्न करत होता. कॅप्टन हॉकिन्स यांच्या माहितीनुसार USS अब्राहम लिंकन (CVN 72) इराणच्या दक्षिणेकडील किनारपट्टीपासून साधारण 500 मैल दुरून जात असतानाच शाहेद 139 विनाकारण या युद्धनौकेच्या दिशेनं पुढे आला. 

हेसुद्धा वाचा : 'दहा वेळा तुमच्याकडे आलो ओssss'; ज्येष्ठ नागरिक अधिकाऱ्यांसमोरच अर्धनग्न, नगर परिषदेला गांधीगिरी करत शिकवला धडा! 

आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर युद्धाची ठिणगी?

CENTCOM च्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय सागरी सीमांमध्ये सक्रिय असणाऱ्या अमेरिकी लष्करानं इशारा देऊनही ड्रोन पुढं येत गेला आणि त्यामुळं सुरक्षिततेच्या हेतूनं अमेरिकेकडून इराणचा ड्रोन पाडण्यात आला. हॉकिन्स यांच्या दाव्यानुसार होर्मुन स्ट्रेटमध्ये इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) फोर्सनं अमेरिकी राष्ट्रध्वज असणाऱ्या एका मर्चंट नेव्हीच्या जहाजाला डिवचण्याचा प्रयत्न केला, हा प्रकार त्या वेळी घडला जेव्हा हे जहाज कायदेशीर गोपनीय दस्तऐवज घेऊन पुढे जात होता. IRGC बोट आणि इराणी ड्रोन अतिशय वेगानं M/V स्टेना इम्पेरेटिवनजीक आले आणि धमकावण्यास सुरुवात केली. तिथूनच काही अंतरावर गाइडेड-मिसाइल डिस्ट्रॉयर USS मॅकफॉल (DDG 74) तैनात होतं. ज्यानं तातडीनं घटनास्थळी पोहोचत अमेरिकी एअरफोर्सच्या डिफेन्सिव्ह एअर सपोर्टसह  M/V स्टेना इम्पेरेटिवला अॅस्कॉर्ट केलं, तेव्हाच इराणी गार्ड तिथून दूर ढाले आणि अमेरिकेचा टँकर पुढे गेला. सागरी हद्दीतील या थरारामुळं दोन्ही देशांमधील तणावात आणखी भर पडली याहे. ज्यामुळं संपूर्ण जगाचं चिंता वाढली आहे. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More