मुंबई : गाझा पट्टीवर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील तणाव कायम आहे. गाझा येथे, आरोग्य मंत्रालयाने पत्रकारांना दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, सोमवारी तणाव सुरू झाल्यापासून 103 पॅलेस्टाईन मरण पावले आहेत आणि 487 जखमी आहेत. हमासच्या अतिरेक्यांनी सोमवारी गाझा येथून इस्रायलवर 1600 हून अधिक रॉकेट सोडले होते. इस्राईलच्या सैन्याने म्हटले आहे की, त्यांनी क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेमार्फत मोठ्या प्रमाणात रॉकेट हवेतच नष्ट केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

90 टक्के प्रभावी


इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेला 'आयर्न डोम' असे म्हटले जात आहे. इस्रायलच्या लष्कराचा असा दावा आहे की, त्याच्या 'आयरन डोम' प्रणालीमुळे शत्रूचे 90 टक्के क्षेपणास्त्र हवेतच नष्ट होतात. या हवाई संरक्षण यंत्रणेमुळे शत्रूंचे ड्रोन्स देखील नष्ट होतात.


जगातील सर्वोत्तम संरक्षण प्रणाली


इस्रायलची कंपनी राफेल अ‍ॅडव्हान्स डिफेन्स सिस्टम आणि इस्त्राईल एरोस्पेस इंडस्ट्रीने ही हवाई संरक्षण यंत्रणा तयार केली आहे. 'आयरन डोम' हवाई संरक्षण प्रणाली जगातील सर्वोत्तम यंत्रणा मानली जाते. दिवस असो की रात्र किंवा कोणत्याही हवामानात ती शत्रूंचे वार नष्ट करण्यास सक्षम आहे.


खरं तर लेबनानच्या हिज्बुल्लाह बरोबर 2006 साली इस्रायलचे युद्ध सुरू झाले. इस्रायलवर शत्रूंनी हजारो रॉकेट सोडले. यातून धडा घेत इस्रायलने प्रगत हवाई संरक्षण यंत्रणा तयार करण्याची घोषणा केली होती.


इस्त्राईलने या प्रगत हवाई संरक्षण यंत्रणेच्या निर्मितीमध्ये अमेरिकेची मदतही घेतली आणि ती जलदगतीने कार्यरत केली. इस्रायल 2011 पासून या हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे आपल्या नागरिकांचे संरक्षण करीत आहे.


ही एक ग्राउंड-टू-एयर डिफेंस सि‍स्‍टम आहे, जी रडार आणि तामीर इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. रडार शत्रूच्या क्षेपणास्त्रांची माहिती देते आणि हे क्षेपणास्त्र किंवा रॉकेट कोठे पडू शकते आणि ते किती दूर आहे हे सांगते. यानंतर, इंटरसेप्टर क्षेपणास्त्र त्यांचे कार्य करतात आणि शत्रूचे रॉकेट हवेत नष्ट होतात.


'आयरन डोम' एयर डिफेंस सिस्‍टम ही बहुउद्देशीय हत्यार आहे. त्याच्या क्षेपणास्त्रांमधील इंटरसेप्टर्स इतके अचूक आहेत की शत्रूची क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि ड्रोन हवेत असलेले अचूक स्थान ट्रॅक करतात आणि नष्ट करतात. हवाई संरक्षण प्रणालीमध्ये लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर नष्ट करण्याची क्षमता देखील आहे.


'आयरन डोम' वएयर डिफेंस सिस्‍टमची अचूकता सुमारे 90 टक्के आहे. त्यात सी-रॅम, क्रूझ मिसाईल, मार्गदर्शित क्षेपणास्त्र (प्रिसिव्ह गाईडेड मिसाईल, पीजीएम), ड्रोन्स (यूएव्ही) आणि इतर हवाई हल्ले उधळण्याची क्षमता आहे.


या संरक्षण प्रणालीमुळे एकाच वेळी 2000 हून अधिक लक्ष्य नष्ट केले जाऊ शकतात. इस्रायलने आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी या जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण यंत्रणेवर (आयरन डोम) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. इस्रायलने सागरी सुरक्षेसाठी तत्सम नौदल आवृत्ती तयार केली आहे. त्याला सी-डोम असे नाव देण्यात आले.