इम्रान खान जिवंत की मृत? जेलमध्ये भावाला भेटून आल्यानंतर बहीण उज्मा यांनी अवघ्या काही तासांत केला मोठा खुलासा

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. अशात इम्रान खान यांची बहीण उज्मा खान नियाझी यांनी तुरुंगात जाऊन इम्रान खानची भेट घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच एक मोठा खुलासा केला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Dec 2, 2025, 07:11 PM IST
इम्रान खान जिवंत की मृत? जेलमध्ये भावाला भेटून आल्यानंतर बहीण उज्मा यांनी अवघ्या काही तासांत केला मोठा खुलासा

Imran Khan : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. इम्रान खान आदियाला तुरुंगात असून त्यांच्या बहिणीला भेट घेता यावी यासाठी जेलबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. इम्रान खान यांच्या पक्षाचे, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) हजारो कार्यकर्ते आणि समर्थकही उपस्थित होते.  इम्रान खान यांना गेल्या तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ कोणालाही भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. कारण इम्रान खान जिवंत आहे की नाही याबद्दल सस्पेंस आज मंगळवारी संपुष्टात आला. कारण इम्रान खान यांची बहीण उज्मा यांनी तुरुंगात भावाची 20 मिनिटं भेट घेतली.

Add Zee News as a Preferred Source

भेटीनंतर बहीणने केला मोठा खुलासा!

इम्रानला भेटल्यानंतर उज्मा यांनी सांगितलं की त्यांची प्रकृती ठीक आहे पण त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. बहिणीसोबतच्या भेटीदरम्यान इम्रान खान अत्यंत संतापल्याचे पाहिला मिळाले. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) रावळपिंडीमध्ये नियोजित निषेधासाठी पुढे जात असताना पाकिस्तान सरकारने उज्मा यांना इम्रान खान यांच्याशी भेटण्याची परवानगी दिली होती. पण, अधिकाऱ्यांनी रावळपिंडीमध्ये सार्वजनिक मेळाव्यांवर बंदी घालत कलम 144 लागू केलंय.  

इम्रान खान ठीक आहे का?

इम्रान खान कुठे आहेत याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. ते जिवंत आहेत की सरकारने त्यांची हत्या केली असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला होता. त्यांच्या बहिणींनी आदियाला तुरुंग अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयाचा अवमान याचिका दाखल करुन भेटण्याची परवानगी मागली. तर इम्रान यांच्या मुलांनी तुरुंग अधिकाऱ्यांकडून उत्तरं मागितली. इम्रान खान यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट 5 नोव्हेंबरची होती. या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर देश पूर्णपणे ताब्यात घेतल्याचा आरोप केल्याचा पाहिला मिळाला होता.

इम्रान यांनी काय आरोप केला?

त्या पोस्टवरून अनेकांनी असे गृहीत धरलं की इम्रान खानला त्यांच्या जीवाला धोका असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी X वर लिहिलंय, "लष्कराने माझ्याविरुद्ध जे काही करता येईल ते केलंय. आता त्यांच्याकडे मला मारण्याशिवाय पर्याय नाही. मी जाहीरपणे म्हटलंय की जर मला किंवा माझ्या पत्नीला काही झालं तर जनरल असीम मुनीर जबाबदार असतील. पण मला भीती वाटत नाही कारण माझा विश्वास मजबूत आहे. मी गुलामगिरीपेक्षा मृत्यूला प्राधान्य देईन." 

त्यांनी मुनीरला "देशाच्या इतिहासातील सर्वात क्रूर हुकूमशहा आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर माणूस" असेही या पोस्टमध्ये म्हटलं. इम्रान खान यांनी असा दावाही केला की मुनीर पाकिस्तानी सरकारमध्ये सर्वकाही चालवतो, त्याला "मुनीर कायदा" असे संबोधलं जातं. त्यांनी सांगितलं की ते आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी "अत्यंत क्रूरतेचा" सामना करत आहेत. त्यांनी असीम मुनीर आणि पाकिस्तानी सरकारवर महिला, मुले किंवा वृद्धांची पर्वा न करता पीटीआय सदस्यांना लक्ष्य करण्याचा आरोपही केला.

 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More