Israel-Iran war: इस्त्रायल इराण युद्धाचा सध्या भडका उडलाय...युद्ध पेटल्याने त्यात सोनं आणि तेल महागलंय.इस्त्रायल इराणच्या संघर्षामुळे जगही आता भीतीच्या सावटाखाली आहे.युद्धामुळे जगात महागाई वाढली असून येत्या काळात गंभीर परिणामांची शक्यता आहे.
इस्रायल-इराणमधलं युद्ध चांगलंच पेटलंय. इस्त्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणनं देखील इस्त्रायलला चोख प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान या दोन्ही देशांच्या युद्धाचा परिणाम आता जगावर झालेल्या पहायला मिळतोय. इराण आणि इस्त्रायलमधील या युद्धाचा परिणाम कच्च्या तेलावर होणार आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढू शकतात.
इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. कच्चा तेलाच्या किंमती 12 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 78.5 डॉलर्सवर आली आहे इस्रायल-इराण युद्धाचा सोन्याच्या किंमतीवरदेखील परिणाम झालाय. भारत या देशांकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. युद्धाच्या परिस्थितीत जर या देशांकडून तेलाचा पुरवठा थांबला तर मोठं संकट निर्माण होऊ शकतं. देशात तेलाच्या किमती वाढतील, महागाई वाढेल त्यामुळे भारताला पर्याय शोधावा लागणार. इस्त्रायलनं इराणवर हल्ला केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्या चांदिच्या दरातही वाढ झालीये. युद्धाच्या स्थितीने गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्यातील गुंतवणुकीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात तेजी आली आहे.
सोन्याच्या दरात 1742 रुपयांनी वाढ झालीय. सोनं 1 लाख 154 रुपयांवर पोहोचलंय. चांदीच्या दरात 533 रुपयांची वाढ झालीय. चांदी प्रतिकिलो 1 लाख 6 हजार रुपयांवर पोहोचलीय.
इराण आणि इस्त्रायलच्या युद्धाचे आता आंतरराष्ट्रीय परिणाम पाहायला मिळतायेत.क्रूड ऑईलच्या दरात 12 टक्क्यांची तेजी आली आहे. वाढत्या तणावाच्या काळात जगातील विविध देशांकडून सोन्याचा साठा करण्यावर भर दिला जातो. त्यामुळं सोन्याच्या दरातही तेजी आली आहे. त्यामुळे युद्धाचे आता आणखी काय काय परिणाम होतात याकडे लक्ष आहे.
IND
(39.4 ov) 193/3 (151 ov) 587
|
VS |
ENG
407(89.3 ov)
|
Full Scorecard → |
AUS
(6 ov) 12/2 (66.5 ov) 286
|
VS |
WI
253(73.2 ov)
|
Full Scorecard → |
MAW
97/2(12.2 ov)
|
VS |
GER
|
Full Scorecard → |
HUN
(19.2 ov) 149
|
VS |
FRA
97(15.3 ov)
|
Hungary beat France by 52 runs | ||
Full Scorecard → |
MLT
(20 ov) 148/9
|
VS |
AUT
101(17.5 ov)
|
Malta beat Austria by 47 runs | ||
Full Scorecard → |
BEL
(8 ov) 141/1
|
VS |
ROM
78/6(8 ov)
|
Belgium beat Romania by 63 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.