Israel and Iran War : इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांत युद्ध पेटलंय. दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हवाई हल्ले करत आहेत. इराणनं इस्रायलवर ड्रोन हल्ले सुरु केलेत. इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनला ऑपरेशन ट्रू प्रॉमिस-3 ने उत्तर देण्यात आलंय. इराणनं इस्रायलवर दीडशेहून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं डागलीयेत.
मध्य-पूर्व आशियात सध्या मोठा तणाव निर्माण झालाय. ता तणावाला कारण ठरलं इस्रायल आणि इराणमधील वाढता संघर्ष. इस्रायलने इराणविरोधात ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केलं. आता या ऑपरेशनला इराणने चोख प्रत्युत्तर दिलंय. ऑपरेशन 'ट्रू प्रॉमिस-3'राबवत एकाच रात्रीत स्नायुवर तब्बल 150 क्षेपणास्त्र डागलीयेत. त्यामुळे इस्त्रायल आणि इराणमधल युद्ध तिस-या महायुद्धांची नांदी आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येतोय
स्वत: अण्वस्त्रधारी असूनही इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला विरोध करत इस्त्रायलने आगळीक केली. 200 फायटर जेट, मिसाईलने इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र कार्यक्र, लष्करी तळ आणि एअरबेसवर हल्ला केला. याचाच बदला घेण्यासाठी इराणने संपूर्ण इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलमधील 2 मोठी शहरं तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये हवाई हल्ले झालेत. इराणनं इस्रायलवर ड्रोन हल्ले सुरु केले. इराणचा एक ड्रोन इस्रायलनं हवेतच नष्ट केला आहे. इराणचा ड्रोन इस्रायलच्या हद्दीत येताच इस्रायलनं अँटिड्रोन मिसाईलनं हे ड्रोन आकाशातच नष्ट केलं.
इराण आणि इस्रायल देश अनेक दशकांपासून शत्रू आहेत. 2024पासून इस्रायलवर हिजबुल्लाह आणि हमासकडूनही हल्ले करण्यात आले. हिजबुल्लाह आणि हमासला इराणचा पाठिंबा आहे. इराणमधील अण्वस्त्र कार्यक्रमाची इस्रायलला धास्ती असल्याने अण्वस्त्र धोका संपवण्यासाठी इस्रायलकडून हल्ले करण्यात येत आहेत. इराणमधील अणू प्रकल्प उद्ध्वस्त करण्याचा इस्रायलचा प्रयत्न आहे.
इस्रायलची आयन डोम ही हवाई संरक्षण प्रणाली अतिशय प्रभावी मानली जाते. मात्र इराणसोबतच्या संघर्षात इस्रायलची ही यंत्रणा फेल गेल्याचं दिसलं. इराणने इस्रायलमधील अनेक ठिकाणांवर अचूक हल्ले केले. इइराणच्या हल्ल्यात इस्रायलमधील 34 नागरिक जखमी झालेत तर एकाचा मृत्यू झालाय. तर इराणमधील 78 नागरिकांचा मृत्यू झालाय.
इराणने केलेल्या हल्ल्यानंतर बनॉनची राजधानी बेरुतमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं...इस्रायल हा इराणसह लेबनॉनचा शत्रू राष्ट्र आहे. त्यामुळे लेबनॉनमध्ये सेलिब्रेशन केलं गेलं. या संघर्षात अमेरिकेनंही इराणवर दबाव टाकण्यास सुरुवात केलीये. अणु करार करा नाहीतर याहून अधिक विध्वंस होईल असा इशारा अमेरिकेनं दिलाय. या सगळ्यात भारतानं तटस्थ भूमिका घेतलीये. दोन्ही देशांसोबत भारताचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील वादावर तोडगा काढायला हवा अशी भूमिका भारताची आहे. आता इराण आणि इस्रायलमधील संघर्ष कधीच निवळणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय.
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 135/9
|
VS |
GER
137/6(18 ov)
|
Germany beat Tanzania by 4 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(20 ov) 207/2
|
VS |
GER
161/8(20 ov)
|
Bahrain beat Germany by 46 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.