World News : 'एक गाव होतं.... त्या गावात....' ही अशी सुरुवात करत एखाद्या भयपटाविषयी बोलणारी अनेक मंडळी असतात. थोडक्यात सांगावं तर, भूताच्या गोष्टी सांगणं हा या मंडळींचा आवडता छंद. पण, याच भूताच्या गोष्टी कल्पनेतून प्रत्यक्षात आकार घेताना दिसल्या तर?
जगाच्या पाठीवर अशी कैक ठिकाणं आहेत ज्यांच्याविषयी अत्यंत भीतीदायक माहिती सांगिदती जाते. या ठिकाणांमध्ये एक गाव असंही आहे जिथं गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही असं म्हणतात. विश्वास बसत नाहीय? हे खरंय. असा दावा केला जातो की जपानमध्ये इनुआकी नावाचं एक असं गाव आहे जिथं जाण्यापासून तेथील सरकारही नागरिकांना रोखतं. या गावाच्या अगदी बाहेरच 'जपानची प्रशासकीय हद्द समाप्त, तुमचं एक पुढचं पाऊल अन् तुम्ही जपानबाहेर' असं थेट सूचित करणारे फलक लावण्यात आले आहेत. इनुआकी या गावाबद्दल असे कैक दावे मागील अनेक वर्षांपासून केले जात आहेत.
इन्स्टाग्रामवर muskanarrates नावाच्या एका अकाऊंटवरूनही या गावाची माहिती देणारा एक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. या गावासंदर्भात नागरिक आणि पर्यटकांमध्ये इतकी दहशत आहे की कोणीही तिथं जायचं धाडस करत नाही. व्हिडीओमध्ये दावा करण्यात आल्यानुसार काही साहसप्रेमींनी या गावात येण्याचं धाडस केलं. पण, तिथून ते परत मात्र येऊ शकते नाहीत. या ठिकाणी असं नेमकं काय घडतं? हाच प्रश्न राहून राहून अनेकांच्या मनात घर करत असताना याच व्हिडीओच्या माध्यमातून या प्रश्नाचंही उत्तर देण्यात आलं आहे.
'इथं माणसांना खाल्लं जातं. इतकंच नव्हे, तर इथं म्हणे मंत्रतंत्र होतात आणि फक्त करमणुकीसाठी नरबळी दिला जातो. इथं किंकाळ्या आणि चित्रविचित्र आवाज ऐकू येतात', या गावाविषयी हेच दावे या व्हिडीओमधघ्ये करण्यात आले आहेत.
खरंच अस्तिचत्वात आहे हे गाव?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जपानमधील इनुआकी हे गाव प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. 1986 मध्ये जपानमधील इनुआकी धरण बांधण्यात आलं त्याचवेळी गे गाव पाण्याखाली गेलं. या गावाचं अस्तित्वं नसलं तरीही त्याविषयीच्या कथा मात्र आजही प्रचलित आहेत. या गावाच्या केंद्रस्थानी असणारा बोगदा 1954 मध्ये इथं येणाऱ्या पर्यटकांना डोंगररांगांपर्यंत जाण्यासाठी बांधला जात होता. जो आता मात्र निर्मनुष्यच पाहाला मिळतो. 1988 मध्ये इथं एक अतिशय भयंकर घटना घडली, जिथं पाचजणांनी एका इसमाचा छळ करून त्याला जीवे मारलं होतं. आजच्या क्षणाला इथं असणारा हा बोगदा सध्या अशा अवस्थेत आहे जिथं कोणालाही जाण्यास मनाई असून एका क्रूर घटनेचा साक्षीदार म्हणूनच तो कुप्रसिद्ध आहे.
(वरील माहिती व्हायरल व्हिडीओवर आधारित असून, कोणत्याही समजुतींना झी 24 तास दुजोरा देत नाही.)