Los Angeles : जागतिक स्तरावर अनेक अभिनेत्री आणि मॉडेल त्यांच्या कलेने चाहत्यांची मनं जिंकत असतात. अभिनेत्री-गायिका सेलेना गोमेझ (Selena Gomez) आणि अमेरिकन मॉडेल हेली बीबर (Hailey Bieber) या दोघींनी त्यांच्या अंदाजाने पुर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे खेचलं आहे. त्या दोघीही आपापल्या कलेत माहिर आहेत. सेलेना गोमेझ तिच्या मुलाखतींमुळे तर  हेली बीबर ही तिच्या मॉडेलींगमुळे नेहमीच चर्चेत असतात. पण ही चर्चा अलीकडेच पार पडलेल्या लॉस एंजेलिसमधील अकादमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्सच्या दुसर्‍या वार्षिक (Academy Museum of Motion Pictures' 2nd annual gala in Los Angeles) उत्सवातली आहे. या दोघी त्या उत्सवात सामील झालेल्या दिसल्या. (Justin Biebers Ex-Girlfriend was seen with his wife nz)


आणखी वाचा - घट्ट कपडे घालणं मलायकाला पडलं महागात; कॅमेरासमोरच घडलं असंकाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


त्या दोघींची त्या इव्हेंटमधील उपस्थिती खूप काही सांगून गेली. त्या दोघी एका फोटोसाठी पोज देताना दिसून आल्या. एका फोटोमध्ये, सेलेना हेलीच्या पायावर हात ठेवताना दिसली आहे आणि दुसर्‍या फोटोमध्ये, त्या दोघींच्या चेहऱ्यावर हसू आहे. त्या दोघी फोटोसाठी पोज देताना खूप खूश होत्या. 


त्यांचा हा फोटो काही क्षणातच सोशल मीडियावर (Social Media) वायरल झाला. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर प्रश्न केले तर काहींना त्या दोघींना एकत्र पाहून आंनद ही झाला. त्या फोटोवर अनेक लोकांनी कमेंट्स देखील केल्या.


आणखी वाचा - उर्फीला अपघातात सावरलं या मुलांनी... नाहीतर तो क्षण तिच्यासाठी ठरला असता...



तुम्हाला माहितच असेल की, अभिनेत्री-गायिका सेलेना गोमेझ ही Justin Bieber ची Ex-Girlfriend आहे. त्या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा कोणापासून लपल्या नाहीत. त्यांनी जगासमोर प्रेम व्यक्त करताना कधीच विचार केला नाही. पण काही कारणात्सव त्यांच्यातले ते नातं तुटले आणि ते दोघही एकमेकांपासून लांब झाले. तर काही वर्षांपूर्वी अमेरिकन मॉडेल हेली बीबर सोबत Justin Bieber ने लग्न केले त्यांच्यातले प्रेम हे सोशल मीडियावर कायम पाहायला मिळते. 



काही महिन्यांपूर्वी सुप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरने रामसे हंट सिंड्रोम (Ramsay Hunt Syndrome) नावाच्या आजाराशी झुंज देत होता. या आजारामुळे त्याच्या चेहऱ्याला पॅरेलिसिस (अर्धांगवायू) या समस्येचा सामना करावा लागत होता. पण प्रकृतीत सूधार झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.