लबुबु डॉलचं जगाला वेड. लबुबु डॉल घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळतं. लबुबु डॉल मोहक की विचित्र ?

ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई : जेन झी पिढी आल्यापासून जे काय नवे ट्रेंड बाजारात खासकरून सोशल मीडियावर येत आहेत.. त्यावर अनेकजण टीका करता तर तितकेच लोक तो ट्रेंड फॉलो करतात.. लबुबु डॉलबद्दल ऐकलं असेल ना.. जगात या कुणाला सुपरक्यूट तर कुणाला मॉन्सटर डॉल वाटणा-या बाहुलीनं धुमाकूळ घातलाय.. तिच्यासाठी लाखो रूपयेही लोक मोजतात.. कोण आहे लबुबु बाहुली?
ओह माय गॉड.. आय गॉट माय लबुबु... नुसतं खेळणं नाही जगात मिरवण्यासारखं लयभारी स्टेटस सिम्बॉल.. ही भावना आहे त्या प्रत्येक लबुबु वेड्या माणसाची.. कुणाला ती भयंकर वाटतेय.. अग्ली, राक्षसी वाटतेय तर कुणाला ती खूपच क्यूट आणि मोहक दिसतेय.. काहीही असो तिच्यापायी अनेकांना वेड लागलं आहे.
सोशल मीडियावर या लबुबु डॉलचं अनबॉक्सिंग होऊ लागलं, आवडत्या रंगासाठी, तिच्या विशिष्ट बनावटीसाठी जास्त लोक ते खरेदी करू लागले. फियर ऑफ मिसिंग आऊट म्हणजेच फोमोमुळे अनेक जण कित्येक तास दुकानांबाहेर गर्दी करू लागले. काही हजारांची किंमत असलेल्या ख-या लबुबुसाठी काहींनी साडेतीन लाख रूपये किंमतही मोजली आहे.
एखादं सर्वार्थानं युजलेस चिनी खेळणं जगाच्या बातम्यांच्या हेडलाईनमध्ये आलं आहे. मग चर्चा तर होणारच.. ही नुसती बाहुली असं पाहणा-याला आणि विकत घेणा-याला वाटत असेल मात्र हा विषय तितका मर्यादित नाही बरं का.. यामागे चीनची आर्थिक डोकॅलिटी आहे. 2019 पॉप मार्टनं लंग बरोबर भागिदारी करार करून ही बाहुली बाजारात आणली. 2024 आणि 2025 मध्ये या लबुबुची मागणी भलतीच वाढली. आता एखादा ट्रेंड सेट कसा होतो तर त्यात फेमस सेलिब्रिटीजचा मोठा वाटा असतो.
जगातल्या अनेक मोठ्या कलाकारांनी लबुबु बॅग्जना लटकवल्या अन् कुरूप लबुबु आवडती झाली. गेल्या वर्षी पॉप मार्ट कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 500 टक्क्यांहून अधिक तेजी आली. 2024 मध्ये कंपनीच्या एकूण महसूलात चीनबाहेर झालेल्या विक्रीचा 40 टक्के वाटा होता. अमेरिका आणि युकेपासून ऑस्ट्रेलिया ते सिंगापूरपर्यंतच्या देशांमध्ये लबुबुला मोठी मागणी, आता हा ट्रेंड भारतातही आला आहे.
या प्रसिद्ध बाहुलीबाबत काही अफवाही पसरल्यात. काहींनी लबुबु बाहुलीमुळे आपल्या आयुष्यात अघटित घडल्याचं सांगितलं. जे असेल ते असेल पण चीन मात्र यातून अर्थव्यवस्था स्ट्राँग करतंय आणि आपला तर तो शत्रू त्यामुळे आपण त्यात न पडलेलंच बरं..बाकी आपला तात्या विंचू बरा.. काय म्हणता ओम फट स्वाहा...