Corona News : चीनमध्ये कोरोनाचं पहिलं प्रकरण सर्वात आधी पुढे आले होतं. त्यानंतर जगभरात त्याचा प्रसार झाला. कोरोनाने (Corona) जगभरात लाखो लोकांचे प्राण घेतले. अनेक ठिकाणी लॉकडाऊन (Lockdown) लागले. 2 वर्ष लॉकडाऊनमुळे व्यवहार ठप्प झाले. पण हाच कोरोना आता पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आल्याने अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा हा नवा उपप्रकार अधिक वेगाने पसरतोय. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची स्थिती येते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. (lockdown in china)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनच्या वुहान (Wuhan) शहरात पहिला व्हायरल मिळाला होता. 2019 मध्ये जगातील पहिलं कोरोनाचं प्रकरण पुढे आल्यानंतर तो वेगाने पसरला आणि त्यानंतर लॉकडाऊन लावावे लागले. पण पुन्हा एकदा वुहानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 


चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढू लागला आहे. वुहानच्या अनेक शहरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या भागात इमारती सील करण्यात आल्या आहेत.  चीनमध्ये आज लागपोठ तिसऱ्या दिवशी कोरोनाचे 1,000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. 30 ऑक्टोबर पर्यंत हा लॉकडाऊन लागू असणार आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. अनेक शहरात सार्वजनिक ठिकाणं बंद ठेवण्यात आली आहेत. कुठल्याही ठिकाणी कोरोनाचा एक ही रुग्ण आढळला तरी ते ठिकाणी सील करण्यात येत आहे. जेथे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसतं आहे. त्या ठिकाणी लगेचच लॉकडाऊन लावण्याची आदेश देण्यात आले आहेत.