महात्मा गांधीजींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत 7 वर्षांची शिक्षा! काय आहे प्रकरण जाणून घ्या

Gandhi’s great-granddaughter jailed: महात्मा गांधी यांच्या पणती आशीष लता रामगोबिन यांना दक्षिण आफ्रिकेतील विशेष आर्थिक गुन्हे न्यायालयाने ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Jun 15, 2025, 12:59 PM IST
महात्मा  गांधीजींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत 7 वर्षांची शिक्षा! काय आहे प्रकरण जाणून घ्या
Mahatma Gandhi's great-granddaughter Ashish Lata Ramgobin jailed

Mahatma Gandhi’s great-granddaughter Ashish Lata Ramgobin:  महात्मा गांधींच्या पणतू आशिष लता रामगोबिन यांनी असे काही केले आहे जे खूपच धक्कादायक आहे. महात्मा गांधी यांच्या पणती आशीष लता रामगोबिन यांना दक्षिण आफ्रिकेतील विशेष आर्थिक गुन्हे न्यायालयाने ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर खोट्या आयात कागदपत्रांवरून ३.२२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. 

काय होती केस? 

दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन स्पेशलाइज्ड कमर्शियल क्राइम कोर्टने हा निर्णय दिला. लता रामगोबिन (वय ५६) यांच्यावर २०१५ मध्ये व्यावसायिक एस. आर. महाराज यांची फसवणूक केल्याचा आरोप होता.  एस. आर. महाराज हे 'न्यू आफ्रिका अलायन्स फूटवेअर डिस्ट्रीब्यूटर्स' चे संचालक असून, त्यांनी लता यांच्यावर विश्वास ठेवून ६.२ मिलियन रँड (सुमारे ₹३.२२ कोटी) दिले होते. लता यांनी दावा केला होता की, त्यांनी भारतातून तिन्ही कंटेनर्समध्ये लिननसामग्री आयात केली असून ती दक्षिण आफ्रिकेतील खाजगी हेल्थकेअर ग्रुप ‘नेटकेअर’साठी असल्याचे सांगितले. त्या रक्कमेचा वापर कस्टम ड्युटी आणि क्लीअरन्ससाठी केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा: Ahmedabad Plane Crash: 'जरा माणुसकी दाखवा,' हॉस्टेल रिकामं करण्यास लावल्यानंतर डॉक्टरला अश्रू अनावर, 'हे इतकं सोपं नाही, माझी मुलगी...'

 

बनावट कागद सादर केले

विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी खोटे खरेदी आदेश, इनव्हॉइस, डिलिव्हरी नोट्स आणि बँक पेमेंट कन्फर्मेशनचे बनावट कागदपत्र सादर केले. त्यांच्या घराण्याच्या प्रतिष्ठेमुळे व्यावसायिक एस. आर. महाराज व्यवहार करायला तयार झाले. मात्र, काही दिवसांतच सगळे कागदपत्र  बनावट असल्याचे उघडकीस आले आणि ते साहित्यही अस्तित्वातच नव्हते. 

हे ही वाचा: "लवकरात लवकर 100 शवपेट्या बनवा!..." एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी अचानक कोणाला कॉल केला?

 

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रार 

प्रकरण उघड झाल्यावर महाराजांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासात आढळले की लता यांनी फसवणूक आणि बनावट कागदपत्र वापरून मोठा आर्थिक गुन्हा केला आहे. राष्ट्रीय अभियोजन प्राधिकरण (NPA) चे ब्रिगेडियर हंगवानी मुलाऊड्झी यांनी न्यायालयात हे सगळं प्रकरण मांडले. 

लोकांची दिशाभूल केली

प्रवक्त्या नताशा कारा यांनी सांगितले की, लता यांनी ईमेल आणि बनावट बिलांच्या आधारे लोकांची दिशाभूल केली. न्यायालयाने फक्त शिक्षा सुनावलीच नाही तर तिच्या अपील करण्याच्या मागणीसुद्धा फेटाळून लावली. २०१५ मध्ये त्यांना  जामिनावर सोडण्यात आले होते. त्या काळात लता या ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर नॉन व्हायोलन्स’च्या ‘पार्टिसिपेटिव्ह डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह’ या कार्यक्रमाच्या संचालक होत्या. त्या राजकीय, सामाजिक आणि पर्यावरणविषयक कामांमध्ये कार्यरत असल्याचा दावा करत असत.

 

हे ही वाचा: Video: "मी 2 तासांपूर्वी त्याच फ्लाइटमध्ये होतो, त्याच वेळी..." अपघातग्रस्त झालेल्या विमानाने प्रवास केल्याचा एका व्यक्तीचा दावा

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by  (@ipulkitkaushal)

लता रामगोबिन यांचे घराणे गांधी विचारांशी जोडलेले आहे. त्यांची आई एला गांधी यांना भारत व दक्षिण आफ्रिकेने शांततेसाठी अनेक सन्मान दिले आहेत. घराण्यातील इतर सदस्य किर्ती मेनन, उमा धुपेलिया-मेस्त्री हेही सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यामुळे त्यांच्या विरुद्धचा हा गुन्हा मोठा धक्का मानला जात आहे.