बांगलादेश सुन्न! उभ्या मालगाडीवर एक्स्प्रेस ट्रेन धडकली; 20 जण ठार, 100 हून अधिक जखमी

बांगलादेशात मोठी दुर्घटना घडली आहे. दोन ट्रेनची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 15 जण ठार झाले असून, 100 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 23, 2023, 06:27 PM IST
बांगलादेश सुन्न! उभ्या मालगाडीवर एक्स्प्रेस ट्रेन धडकली; 20 जण ठार, 100 हून अधिक जखमी title=

बांगलादेशमध्ये मोठी दुर्घटना घडली आहेदोन ट्रेनची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 15 जण ठार झाले असून, 100 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राजधानी ढाकापासून 80 किमी दूर भैरब येथे प्रवासी ट्रेनने एका मालगाडीला धडक दिली. दोन्ही ट्रेन वेगवेगळ्या दिशेने धावत होत्या. धडकेनंतर दोन्ही ट्रेन रुळावरुन खाली घसरल्या. दुर्घटनेनंतर प्रवाशांची एकच आरडाओरड सुरु झाली होती. 

स्थानिक पोलीस अधिकारी सिराजूल इस्लाम यांनी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. सरकारी अधिकाऱ्याने एफपीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला 15 मृतदेह सापडले आहेत. अनेकजण जखमी असून आकडा वाढू शकतो. 

बचावकार्य सुरु असून यादरम्यान खाली दबलेले आणखी मृतदेह सापडू शकतात. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ट्रेन एकाच ट्रॅकवर आल्याने ही दुर्घटना झाल्याचं रहमान म्हणाले आहेत.

बांगलादेशात ट्रेन अपघात होणं ही आता सामान्य बाब झाली आहे. खराब सिग्नल, बेजबाबदारपणा, जुने ट्रॅक आणि खराब पायाभूत सुविधा यामुळे या दुर्घटना होत असतात.