नवी दिल्ली : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने सन्मानित केल गेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माटुंगा रेल्वे स्थानकावर संपूर्ण महिला कर्मचारी वर्ग असणार आहे. एअरलाईन्सनेही महिला भरतीला प्रोत्साहन दिलेय. अशाच प्रकारे मॅक्डॉनल्डनेही अशाच काहीशा प्रकारे महिला दिन साजरा केला.


उलटा लोगो 


महिलांच्या सन्मानार्थ मॅकडॉनल्डने आपला लोगो उलटा केलाय.उलट्या लोगोचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायतय. याला मॅकडॉनल्डचा एक पब्लिसिटी स्टंटही म्हटले जाते.


इतिहासात पहिल्यांदाच 


जगभरातील महिलांच्या सन्मानार्थ मॅकडॉनल्डने ८ मार्चला आपला लोगो उलटा केल्याचे मॅक्डीच्या ग्लोबल चीफ डायवर्सिटी ऑफिसर वेंडी लुईस यांनी सांगितले. त्यामूळे 'मॅक्डी' च्या इतिहासात पहिल्यांदाच ८ मार्च ला  M चा W करण्यात आला.


पब्लिसीटी स्टंट 


रिपोर्टनुसार केवळ अमेरिकेतील एका स्टोअरचाच लोगो उलटा करण्यात आला.


अमेरिकेत १० पैकी ६ मॅक्डॉनल्डच्या मॅनेजर महिला असल्याचेही सांगण्यात येतयं.


सोशल मीडियावर कोणाच्या हे पसंतीस पडले नाही. लोकांनी त्याला पब्लीसीटी स्टंट असे हिणवले.