काबूल: काबूलमध्ये सध्या परिस्थिती अत्यंत भीषण आहे. तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर लोक आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडून जाण्यासाठी धडपडत आहेत. विमानात जागा न मिळाल्याने विमानावर बसून पळण्याचा प्रयत्नात असलेल्यांचा पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ताजी आहे. तर विमानतळावर गोळीबार होत असल्यानं लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानातील ही परिस्थिती भयंकर आहे. एकीकडे तालिबान राज सुरू होत असताना महिलांना आता चिंता लागून राहिली आहे. तान्ह्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी आईला आपल्या काळजावर दगड ठेवण्याची वेळ आली आहे. याचं कारण म्हणजे तालिबानमध्ये आपलं तान्हं बाळही सुरक्षित नाही याची जाणीव या आईला झाली. तिने आपलं मन घट्ट केलं आणि आपल्या चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी मोठा निर्णय घेतला. 



या आईच्या निर्णयामुळे तान्हाचा जीव तर वाचेल पण आतून पुरत्या खचलेल्या आईकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तालिबान्यांच्या कब्जानंतर अफगाणी जनतेच्या जीवन मरणाचा संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत अफगानिस्तानातून एक हृदयद्रावक व्हिडीओ समोर येतो आला आहे. 


तालिबान्यांपासून तान्हुल्याचा जीव वाचवण्यासाठी एका महिलेनं आपल्या बाळाला अमैरिकन सैन्याकडे सुपूर्द केलं आहे. ह्या व्हिडीओमध्ये हे दृश्यं दिसत आहे. आपल्या काळजावर दगड ठेवून आईनं आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी बाळाला सैन्याकडे सोपवलं आहे. 


सोशल मीडियात हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. यावरून अफगाणिस्तानात किती बिकट स्थिती आहे याची कल्पना हा व्हिडीओ पाहून येईल. मोठेच नाही तर तान्हुले देखील अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या राज्यात आता किती सुरक्षित असतील असा प्रश्नच उपस्थित होत आहे.