टेक ऑफ नंतर 30 वर्षानंतर विमान लँड झाले पायलटने एक प्रश्न विचारला; नंतर जे काही घडलं ते रहस्य आजपर्यंतच कुणालाच उलगडले नाही

एका रहस्यमयी विमान प्रवासाची सध्या मठी चर्चा आहे. टेक ऑफ नंतर 30 वर्षानंतर विमान लँड झाले पायलटने एक प्रश्न विचारला. मात्र, यानंतर जे काही घडलं ते अनपेक्षित आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 14, 2025, 10:31 PM IST
टेक ऑफ नंतर 30 वर्षानंतर विमान लँड झाले पायलटने एक प्रश्न विचारला; नंतर जे काही घडलं ते रहस्य आजपर्यंतच कुणालाच उलगडले नाही

Mystery Of Flight 914 :  टेक ऑफ नंतर एक विमानाने तब्बल 30 वर्षानंतर लँडिंग केल  कुणी सांगितले तर अजिबात विश्वास नाय बसणार. पण, असं घडलं आहे. टेक ऑफ नंतर  एका विमानाने 30 वर्षांनतर लँडिंग केले. मात्र, या पेक्षा अनपेक्षित विमानाच्या लँंडिगनंतर घडले. हे विमान लँड होताना या विमानाच्या पायटने एक प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर एकल्यावर विमानाने पुन्हा टेक ऑफ केले. तेव्हापासून  हे विमान  एक मोठं रहस्य बनले आहे. याचे रहस्य अद्याप कुणालाच उलगडलेले नाही.  

अमेरिकेच्या फ्लाइट 914 ची ही रहस्यमयी कहाणी आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्लाइट 914 ने 2 जुलै 1955 रोजी न्यू यॉर्कहून मियामीला उड्डाण केले. या विमानात एकूण 57 प्रवासी होते, त्यांच्यासोबत 6 क्रू मेंबर्स होते. हे विमानाने न्यू यॉर्कहून उड्डाण केले होते, पण मियामीला कधीच पोहोचले नाही. ते मध्यभागी, म्हणजेच हवेत चगायब झाले. अमेरिके सरकारने याचा खूप शोधला घेतला. मात्र, आजपर्यंत कोणताही सुगावा लागलेला नाही.

या घटनेतील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे 30 वर्षांपूर्वी म्हणजेच 1955 मध्ये गायब झालेले फ्लाइट 914 हे विमान 9 मार्च 1985 रोजी व्हेनेझुएलाच्या कराकस विमानतळावर रहस्यमयरित्या लँड झाले.  विमानतळाच्या वाहतूक नियंत्रण विभागाला या लँडिंगची माहिती नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा हे फ्लाइट कराकस विमानतळावर उतरले तेव्हा विमानाच्या पायलटने तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारले की ते कोणते वर्ष आहे.

ग्राउंड स्टाफने त्याला सांगितले की ते वर्ष 1985 आहे. हे ऐकून पायलटने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला अरे देवा. यानंतर, कोणालाही काही समजण्यापूर्वीच विमान पुन्हा आकाशात उडाले. आजपर्यंत या रहस्यमय विमानाबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. अमेरिका अजूनही हे रहस्यमय गूढ उकलण्यात गुंतलेली आहे.