Sunita Williams Return News in Marathi: नासा (NASA) या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या सेवेत असणाऱ्या आणि भारतीयं वंशाच्या असल्यामुळं देशासाठी अभिनास्पद कामगिरी करणाऱ्या सुनिता विलियम्स यांच्या अवकाशातून परतीच्या प्रवासाकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे. बोईंग स्टारलायनंरनं सुरू झालेला त्यांचा 9 महिन्यांचा हा प्रवास अखेर पूर्ण होण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
तब्बल 9 महिने आणि 13 दिवसांच्या कालावधीनंतर आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विलियम्स, बुच विल्मोर पृथ्वीवर परतण्यासाठी अवकाशातून मार्गस्थ झाले. निक हेग आणि अलेक्झांडर गोरबुनोव हे आणखी दोन अंतराळवीरही त्यांच्यासोबत 18 मार्च 2025 रोजी या एकमेव मानवी जीवनाचं अस्तित्व असणाऱ्या ग्रहाच्या दिशेनं झेपावले.
चाहरी अंतराळवीर ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये बसल्यानंतर सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी या स्पेसक्राफ्टचे हॅच म्हणजेच दरवाजे बंद झाले आणि 10 वाजून 35 मिनिटांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपासून हे स्पेसक्राफ्ट वेगळं झालं. 19 मार्च रोजी दुपारी 3 वाजून 27 मिनिटांनी हे स्पेसक्राफ्ट फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर लँड होत पृथ्वीवर उतरणार आहे.
नासानं या संपूर्ण मोहिमेचे असंख्य व्हिडीओ X च्या माध्यमातून शेअर करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ड्रॅगन स्पेसक्राफ्च आणि आयएसएस एकमेकांपासून वेगळे होताना अर्थात संपूर्ण अनडॉकिंग प्रक्रिया पार पडताना दिसत आहे. चारही अंतराळवीरांसह सुनिता विलियम्स यांनी अंतराळाला अलविदा करत अखेर पृथ्वीच्या दिशेनं कूच केली.
या चार अंतराळवीरांना घेऊन हे यान 17 तासांच्या प्रवासानंतर पृथ्वीवर निर्धारित स्थानी लँड होईल. फ्लोरिडातील खाडी/ सागरि किनाऱ्यावर ये यान समुद्रात स्प्लॅशडाऊन होईल म्हणजेच पॅराशूटच्या मदतीनं पाण्यात कोसळेल.
#WATCH | NASA tweets, "They're on their way. Crew 9 undocked from the International Space Station at 1:05 am ET (0505 UTC)."
(Video: NASA/X) pic.twitter.com/T2udaxTvBM
— ANI (@ANI) March 18, 2025
LIVE: @NASA_Astronauts Nick Hague, Suni Williams, Butch Wilmore, and cosmonaut Aleksandr Gorbunov are packing up and closing the hatches as #Crew9 prepares to depart from the @Space_Station. Crew-9 is scheduled to return to Earth on Tuesday, March 18. https://t.co/TpRlvLBVU1
— NASA (@NASA) March 18, 2025
स्पेसक्राफ्ट लँड होणं अतीव महत्त्वाचं असून त्यातील अखेरचं प्रत्येक मिनिट तितकंच महत्त्वाचं असणार आहे.
18 मार्च सकाळी 8 वाजून 15 मिनिटं - यानाची दारं बंद अर्थात हॅच क्लोज
18 मार्च सकाळी 10 वाजून 35 मिनिटं- अनडॉकिंग (आयएसएसपासून यान वेगळं होणं)
19 मार्च सकाळी 2 वाजून 41 मिनिटं - डीऑर्बिट बर्न (वातावरणात यानाचा प्रवेश)
19 मार्च सकाळी 3 वाजून 27 मिनिटं - स्प्लॅशडाऊन (समुद्रात यानाची लँडिंग)
19 मार्च सकाळी 5 वाजता- पृथ्वीवरील परतीच्या प्रवासासंदर्भात माध्यमांशी संवाद
नासाच्या माहितीनुसार हवामानाचा आढावा घेता स्प्लॅशडाऊनसाठीची जागा निर्धारित केली जाणार आहे. स्प्लॅशडाऊनच्या दरम्यान संपूर्ण लाईव्ह व्हिडीओ नासा जारी करणार असून ऑर्बिटींग प्रयोगशाळेच्या माहितीशिवाय इतरही सविस्तर माहिती नासा वेळोवेळी देत राहणार आहे.