सोलर सिस्टीमधून गायब होणार मंगळ ग्रह, NASA चा संपर्क तुटणार; जगाचा विनाश अटळ?
मंगळ ग्रह सूर्यमालेतून गायब होणार आहे. यामुळे मंगळ ग्रहावर संशोधन करणाऱ्या उपग्रहांचा संपर्क देखील तुटणार आहे.
Mars Is About To Disapper: संशोधक मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. मंगळ ग्रहबाबत संशोधन करण्यासाठी NASA तर्फे अनेक मोहिम राबवल्या जात आहेत. यापैकी अनेक मोहिमांमध्ये नासाने लक्षवेधी यश मिळवले आहे. तर, अनेक मोहिमा या यशस्वी टप्प्यावर आहेत. अशातच आता मंगळ ग्रहच सोलर सिस्टीमधून गायब होणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे नासाचा मंगळ ग्रहाशी संपर्क तुटणार आहे. अनेक मोहिमा यामुळे संपुष्टात येणार आहेत. यामुळे पृथ्वीचा विनाश हेण्याची भिती देखील व्यक्त केली जात आहे.
नासासह आता चीन देखील मंगळ मोहिम राबवत आहे. संशोधनादरम्यान मंगळ ग्रहबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंग ग्रहबाबत संशोधन करणाऱ्या उपग्रहांना दर दोन वर्षांनी सौर संयोग म्हणून ओळखल्या जाणार्या खगोलीय घटनांचा अनुभव येतो. सुमारे दोन आठवडे संप्रेषणातील ब्लॅकआउटचा सामना करावा लागतो.
सौर संयोग या खगोलीय स्थितीत पृथ्वी आणि मंगळ, त्यांच्या सूर्याभोवती सतत परिभ्रमण करताना, सूर्याद्वारेच एकमेकांपासून अस्पष्ट असतात. या खगोलीय रेषेमुळे दोन्ही ग्रह एकमेकांसाठी तात्पुरते अदृश्य होतात. 2023 मध्ये, मंगळ ग्रहाचे संशोधन करणाऱ्या स्पेसक्राफ्टला कमांडिंग करून निरीक्षण केले जाणार आहे. सौर संयोग 11 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान नियोजित आहे. या दरम्यान मंगळ ग्रह सूर्याच्या 2 अंशांच्या आत असेल. या काळात स्पेसक्राफ्टसोबतचे संप्रेषण कठोरपणे मर्यादित असेल अेस NASA ने म्हटले आहे.
नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत या अनुषंगाने तयारी केली जात आहे. मंगळ ग्रहाचे संशोधन करणाऱ्या स्पेस क्राफ्टमधील काही उपकरणे बंद केली जात आहेत. तसेच काही उपग्रहांकडून डेटा घेतला जात आहे आणि तो संग्रहित केला जात आहे. तर काही उपकरणे पृथ्वीवर डेटा पाठवत राहतील. सौर संयोग कालावधीत काही डेटा गहाळ होण्याची देखील शक्यता आहे.
सौर संयोगादरम्यान मंगळ ग्रहावर संशोधन करणाऱ्या उपग्रहाना कोणत्याही नवीन सूचना पाठवल्या जात नाहीत. या काळात उपग्रहााल सूर्यापासून संभाव्य धोका निर्माण होवू शकतो. स्पेस क्राफ्टमध्ये असलेल्या ऑटोपायलट तंत्रज्ञानामुळे सौर संयोगादरम्यानही संशोधन करणे शक्य आहे. नासा व्यतिरिक्त चीन आणि UAE चे स्पेसक्राफ्ट मंगळावर घिरट्या घालत संशोधन करत आहे.