नेपाळमध्ये पुजली जाणार 2 वर्षांची 'जिवंत देवी'; वर्षानुवर्षे चालणाऱ्या या प्रथेचा महाराष्ट्रातील तुळजाभवानीशी आहे संबंध?

Aryatara Shakya Nepal Kumari: भारताचे शेजारील राज्य नेपाळमध्ये जिवंत देवीची निवड करण्यात आली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 5, 2025, 12:25 PM IST
नेपाळमध्ये पुजली जाणार 2 वर्षांची 'जिवंत देवी'; वर्षानुवर्षे चालणाऱ्या या प्रथेचा महाराष्ट्रातील तुळजाभवानीशी आहे संबंध?
Nepal new Kumari Devi Selection Process Living Goddess of Nepal aryatara shakya welcomed in kathmandu kumari tradition

Aryatara Shakya Nepal Kumari: भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये 30 सप्टेंबर रोजी नवीन कुमारे देवीची निवड करण्यात आली. शास्त्रानुसार कुमारी देवीची निवड करुन तिला सिंहासनावर बसवण्यात आलं. एका उत्सवादरम्यान फक्त अडीच वर्षांच्या आर्यतारा शाक्य या मुलीची देवी म्हणून निवड करण्यात आली. जिवंत देवी म्हणून तिचा अभिषेकदेखील करण्यात आला. 

Add Zee News as a Preferred Source

आर्यताराच्या आधी तृष्णा शाक्य शाही कुमारे देवी होती. 27 डिसेंबर 2017 रोजी तिला निवडण्यात आलं होतं. तेव्हा तिचं वय फक्त 3 वर्षे इतके होतं. तसंच, नेपाळमध्ये पूजण्यात येणाऱ्या कुमारी देवी यांना खास दर्जा असतो. त्यांना अनेक जण पुजतात. मात्र या कुमारी देवी एका घराच्या आत एकांत आणि गुप्तपणे जीवन व्यतित करतात. तसंच. समाजात खूप कमीवेळा दिसतात. एक जिवंत देवी शाक्य परंपरेच्या खास क्षणीच घरातून बाहेर पडतात. त्या घरातून वर्षातून फक्त 13 वेळाच बाहेर पडू शकतात. तसंच, कुमारी देवी या मासिक पाळी सुरू होईपर्यंत काठमांडू येथील कुमारी घरात आई-वडिलांपासून दूर देवीप्रमाणेच राहतात. 

नवीन कुमारी देवीची निवड कशी होते?

कुमारी देवीसाठी त्याच मुलींची निवड केली जाते. ज्यांचे वय 2-4 वर्ष इतके आहे. तसंच, तिच्या शरीरावर कोणतेही व्रण किंवा खूण नाही. त्यांचे केस, डोळे आणि दात पूर्णपणे आरोग्यदायी असतील आणि त्या निडर असतील. काळोखालाही न भिणाऱ्या असतील. 

तुळजाभवानीचे प्रतिनिधित्व?

वरिष्ठ पत्रकार चंद्रभूषण त्यांच्या 'भारत से कैसे गया बुद्ध का धर्म' या पुस्तकात म्हणतात की,  नेपाळची कुमारी देवी पंरपरा भारतीय शाक्त परंपरेशी साधर्म्य असलेली आहे. कुमारी देवी तुळजा भवानीचे प्रतिनिधित्व करते. या देवीला महिषासूरमर्दिनीदेखील म्हण तात. नेपाळमध्ये ही देवी नेवार बौद्ध समुदायातदेखील पूजली जाते. तज्ज्ञांच्या मते, तुळजा भवानीचा उल्लेख किंवा चरित्र कोणत्याही बुद्ध परंपरा आणि ग्रंथात सापडत नाही. नेपाळमध्ये तुळजाचा उच्चार तलजूसारखा असून काहीजण तलेजू असंदेखील म्हणतात.

कुमारी देवींचे रडणे अशुभ

कुमारी देवी भक्तांना अत्यंत शांत मुद्रेने भेटते तसंच, इशाऱ्यांमध्ये भाव प्रकट करते. तसंच, नेपाळमध्ये कुमारी देवीचे रडणे अशुभ मानले जाते. 2001मध्ये 6 वर्षांची कुमारी देवी (चनीरा बज्राचार्य) सतत चार दिवस रडत होती. तिच्या रडण्याच्या शेवटच्या दिवशी 1 जून 2001 ला नेपाळचे तत्कालीन युवराजने त्याचे आई-वडिल राजा बीरेद्रे आणि राणी ऐश्वर्यासह शाही कुटुंबातील नऊ लोकांची हत्या केली आणि स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. 

कुमारी देवीसोबत लग्न करण्यात घाबरतात लोक?

कुमारी देवीबाबत कित्येक वर्षांपासून एक मान्यता चालत आली आहे. कुमारी देवीसोबत लग्न करणाऱ्या मुलांचा कमी वयातच मृत्यू होतो आणि त्यांना संपूर्ण आयुष्य एकट्याने काढावे लागते. जेव्हा कुमारी देवी सामान्य जीवन जगू लागते आणि तिचे लग्नाचे वय झाले तरी कोणीही लग्नासाठी तिच्याशी तयार होत नाही. 

लोक या मान्यतेमुळंच त्याच्या घरातील मुलांची लग्न माजी कुमारी देवींसोबत करत नाही. त्यांना भिती असते की त्यांच्या मुलांचा अकाली मृत्यू होईल. 

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More