Ambedkar Day In New York: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती केवळ भारतातच नव्हेतर जगभरात साजरी केली जाते. संपूर्ण जगात बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला जात आहे. न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी 14 एप्रिल हा दिवस डॉ. भीमराव आंबेडकर दिवस म्हणून घोषित केला आहे. महापौर अॅडम्स यांनी म्हटले की, बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, या संदेशाचा उल्लेख केला.
महापौर कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, न्यू यॉर्क शहराच्या महापौर कार्यालयाचे आंतरराष्ट्रीय व्यवहार उपायुक्त दिलीप चौहान यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. आठवले म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची न्यू यॉर्कच्या महापौर कार्यालयाने अधिकृतपणे घोषणा केल्याने हा संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात एक ऐतिहासिक क्षण आहे.
'बाबासाहेबांच्या न्याय आणि समानतेच्या जागतिक वारशाचा सन्मान केल्याबद्दल महापौर @NYCMayor आणि उपायुक्त दिलीप चौहान यांचे मनापासून आभार,' असे रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
Historic Moment: Dr. B. R. Ambedkar Jayanti Officially Proclaimed in New York City | Ramdas Athawale
Special thanks to Mayor @NYCMayor and Deputy Commissioner Dilip Chauhan for this powerful recognition.#AmbedkarJayanti #JaiBhim #DrAmbedkar #NYCProclamation #RamdasAthawale… pic.twitter.com/NavfDf6l1C— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) April 15, 2025
न्यूयॉर्क शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच ही घोषणा झाली आहे. त्यामुळं बाबासाहेबांच्या आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार होणार आहे. बाबासाहेबांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले होते. आज त्याच शहरात बाबासाहेबांचा जन्मदिवस डॉ. भीमराव आंबेडकर दिवस म्हणून घोषित केला जात आहे. ही घोषणा भारतासाठी अभिमानाची बाब आहे.