Ancient Egyptian Tomb Discovery: इजिप्त किंवा तेव्हाचं मिस्र....प्रचंड रहस्यमयी असं पृथ्वीवर अस्तित्वात असणारं हे ठिकाणय अशा या इजिप्तमध्ये सातत्यानं उत्खननातून असे संदर्भ सापडत आहेत, जे भारावून सोडणारे आहेत. असंच आणखी एक कोडं या इजिप्तनं जगासमोर आणलं आहे, जे 900 वर्षांपासून कोणालाही सोडवता आलेलं नाही.
इजिप्तमधील असवान शहरानजीकच्या नाईल नदीपात्रावर असणाऱ्या डोंगरांच्या खोदकामादरम्यान पुरातत्त्वं विभागाच्या हाती एक असं रहस्य आलं आहे, ज्यानं सारेच थक्क आहेत. इथं सुरू असणाऱ्या खोदकामादरम्यान 30 हून अधिक प्राचीन थडगी सापडली असून, एका दगडी ताबूतामध्ये दोन ममी एकमेकांना बिलगलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. हे असं नेमकं का, याचा मात्र उलगडा होऊ शकला नाही.
इटली आणि इजिप्तमधील संशोधकांच्या टीमच्या हाती हा मोठा ऐतिहासिक खजिना लागला असून, हे ठिकाण आधी अवैध खोदकामादरम्यान सापडलं, ज्यानंतर सरकारनं त्यावर ताबा घेत पुढील वैज्ञानिक कार्यवाही सुरू केली. ज्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार या कब्रस्तानाचा वापर इसवी सनपूर्व 332 ते 395 पर्यंत केला गेला होता.
संशोधकांनी उपलब्ध अवशेषांवरून केलेल्या संशोधनानुसार इथं सापडलेल्या मृतावशेषांमध्ये 40 टक्के अवशेष हे नवजात किंवा 2 वर्षांहून कमी बालकांचे आहेत. ज्यामुळं असं भासत आहे की तेव्हा मोठी महामारी किंवा कुपोषणासारख्या समस्या प्रचंड प्रमाणात भेडसावत होत्या. या खोदकामात मिळालेली 10 मजली थडग्यास्वरुप आकृतीसुद्धा हैराण करणारी आहे. यामध्ये तेलाचे पुरातन काळातील दिवे सापडले असून त्यांचा वापर शोक समारंभात केला जात होता.
शोधकार्यात सापडलेल्या पहिल्या थडग्यामध्ये दोन ममी एकमेकांना बिलगलेल्या अवस्थेत सापडल्या असून त्या नेमक्या कोणाच्या आहेत आणि अशा स्थितीत का ठेवण्यात आल्या होत्या, याच प्रश्नाची उकल संशोधकसुद्धा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
उत्खननादरम्यान या क्षेत्रात थडग्यांमध्ये जळलेली माती, रंगीत गाद्या, लाकडी थडगी आणि बळी देण्याच्या वस्तूसुद्धा सापडल्या. अधिक उकल केली असता, इथं गरीब कुटुंबातील व्यक्तींना खालच्या भागात दफन केलं जात होतं, तर वरील भाग हा धनिकांसाठी होता. काही थडगी मोकळ्या भागात होती, तर काही डोंगर कापून तिथं तयार करण्यात आली होती. येथील अनेक मृतावशेषांमध्ये क्षयरोग (TB), कुपोषण आणि हाडांच्या आजाराचे संकेत मिळाले. संशोधकांच्या मते तर, टीबीसारख्या आजारानं इथं अनेक कुटुंबच्या कुटुंबांचा घात केला असावा.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.