अमेरिकेत भीषण स्फोटात तब्बल 18 हजार गायी ठार, नेमकं काय घडलंय?
Texas Cow Death: अमेरिकेतील टेक्सास (Texas) येथे एका डेअरी फार्ममध्ये (Dairy Farm) लागलेल्या भीषण आगीत होरपळून 18 हजार गायी ठार झाल्या आहेत. ही अमेरिकेतील गोदामाला लागलेली सर्वात भीषण आग असल्याचं बोललं जात आहे.
Texas Cow Death: अमेरिकेतील टेक्सास (Texas) येथे भीषण दुर्घटना घडली आहे. एका डेअरी फार्ममध्ये (Dairy Farm) भीषण स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत होरपळून 18 हजार गायी ठार झाल्या आहेत. अमेरिकेत गोदामात लागलेली ही आतापर्यंतची सर्वात भीषण आग असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान डेअरी फार्मची मालकी असणाऱ्या कुटुंबानेही आतापर्यंत या घटनेवर काही भाष्य केलेलं नाही.
Dimmitt शहराजवळ असणाऱ्या South Fork Dairy मध्ये झालेल्या स्फोटात एक व्यक्तीही गंभीर जखमी झाला आहे. फार्ममधील मशिनरीमुळे मिथेन वायू पेटला असावा, असा अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. अमेरिकेत 2018 ते 2021 दरम्यान जवळपास 30 लाख प्राण्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
सोमवारी भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास डेअरी फार्ममध्ये आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. आगीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून यामध्ये धुराचे मोठे लोट दिसत आहेत.
पोलीस आणि आपातकालीन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तेव्हा एक व्यक्ती आत अडकला होता. त्याची तात्काळ सुटका करत जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं.
आगीत होरपळून नेमक्या किती गाईंचा मृत्यू झाला आहे याची नेमकी माहिती मिळाली नाही. पण शेरीफ कार्यालयाने बीबीसीला जवळपास 18 हजार गाई ठार झाल्याचं सांगितलं आहे.
शेरीफ Sal Rivera यांनी आग 'honey badger' नावाने ओळखल्या जाणार्या मशीनने लागली असावी असा अंदाज असल्याचं सांगितलं आहे. ही मशीन व्हॅक्यूम जे खत शोषतं आणि पाणी बाहेर काढतं. कदाचित मशीन जास्त गरम झाले आणि कदाचित मिथेन आणि त्यासारख्या गोष्टी पेटल्या आणि पसरल्या व स्फोट झाला असं ते म्हणाले आहेत.
वॉशिंग्टन डीसी येथील प्राणी कल्याण संस्थेने जर 18 हजार गायींचा मृत्यू झाल्याला दुजोरा मिळाला तर हा आतापर्यंत गुरांच्या गोठ्यातील 2013 मध्ये आकडेवारी ठेवण्यास सुरुवात झाल्यापासून सर्वात प्राणघातक आग असेल असं सांगितलं आहे.
"आम्हाला आशा आहे की यापुढे फार्ममध्ये आगीशी संबंधित सुरक्षांची उपाययोजना केली जाईल. हा उद्योग या समस्येवर लक्ष केंद्रित करेल अशी आशा आहे," असं एडब्ल्यूआयच्या फार्म अॅनिमल प्रोग्रामचे पॉलिसी सहयोगी अॅली ग्रेंजर म्हणाले आहेत. "जिवंत जाळण्यापेक्षा इतर कोणत्याही वाईट गोष्टीची कल्पना करणं कठीण आहे," असंही त्यांनी सांगितलं.
AWI च्या माहितीनुसार, 2013 पासून सुमारे 65 लाख जनावरे धान्याच्या कोठारात लागलेल्या आगीत ठार झाली आहेत, त्यापैकी सुमारे 6 लाख कोंबड्या आणि सुमारे 7,300 गायी होत्या. तसंच 2018 आणि 2021 दरम्यान, जवळपास 30 लाख शेतातील प्राणी आगीत मृत्यूमुखी झाले आहेत. त्या कालावधीतील सहा सर्वात मोठ्या आगीत 17 लाख कोंबड्यांचा मृत्यू झाला.