पहलगामच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख मुनीरचा समावेश; अमेरिकेतून मोठा पुरावा

मुनीरनं भ्रष्टाचार करून अमेरिकेत मोठी माया जमवली आहे. आपल्या परिवाराला त्यानं अमेरिकेत पाठवून भारताच्या भीतीनं स्वत: लपून बसलाय...येत्या काळात मुनीरचाही पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

नेहा चौधरी | Updated: May 17, 2025, 10:44 PM IST
पहलगामच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख मुनीरचा समावेश; अमेरिकेतून मोठा पुरावा

आसिम मुनीर हे पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख आहेत. मात्र आता त्यांना दहशतवादी घोषित करण्याची मागणी थेट अमेरिकेतून झाली आहे. पहलगामच्या हल्ल्यात मुनीरचा समावेश असल्याचा मोठा पुरावा अमेरिकेतून समोर आलाय. भारतानं पाकला घरात घुसून धडा शिकवला. मात्र त्यापूर्वी रणगाड्यावर उभं राहून पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर भारताला पोकळ धमक्या देत होते. पाकिस्तानसाठी मुनीर हा त्यांचा लष्करप्रमुख असला तरी भारतासाठी तो आता मोस्ट वाँटेंड दहशतवादी झालाय. हाफिज सईद, मसूद अजहर आणि ओसामा बिन लादेन यांच्यामध्येच मुनीरची गणना केली जात आहे. पहलगामच्या हल्ल्यात मुनीरचा समावेश असल्याचा मोठा पुरावा अमेरिकेतून समोर आलाय. तिथं मुनीरची तुलना लादेनशी केली जात आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागातील एका माजी अधिकाऱ्यानं मुनीरला लादेनची उपमा दिलीय. मुनीरला लादेनसारखाच दहशतवादी घोषित करा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अमेरिकेतून ही मागणी झाल्यानंतर आता भारतातूनही थेट मुनीरवर स्ट्राईक करण्याची मागणी होत आहे. अमेरिकेनं लादेनला घरात घुसून मारलं होतं. त्यामुळे भारतावर वाईट नजर ठेवणा-या मुनीरलही धडा शिकवण्याची मागणी होत आहे. पाकिस्तानातही मुनीरची प्रतिमा अय्याश जनरल अशीच आहे. इतकंच काय तर लष्करातही मुनीरविरोधात संतापाची लाट आहे. भारत-पाकमधील तणावामुळे मुनीरनं आपल्या परिवाराला अमेरिकेत पाठवलंय. मुनीरला दहशतवादी म्हणून घोषित केल्यास त्यांची भष्ट्राचाराची लंकाही जळून खाक होऊ शकते. 

मुनीरनं भ्रष्टाचार करून अमेरिकेत मोठी माया जमवली आहे. आपल्या परिवाराला त्यानं अमेरिकेत पाठवून भारताच्या भीतीनं स्वत: लपून बसलाय...येत्या काळात मुनीरचाही पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.