पाकिस्तान हा दहशतवादाचा पोशिंदा आहे. भारतातील जवळपास सर्वच दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा हात असतो हे सर्वांना माहित आहेच. मात्र दहशतवादाचा हा ब्रम्हराक्षस पाकिस्तावरच उलटल्याचं पाहायला मिळतंय. पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झालाय.
दहशतवादाला खतपाणी घालण्याचे परिणाम पाकिस्तानला वरचेवर भोगावे लागतच असल्याचं पाहायला मिळतंय. कारण आता दहशतवाद्यांनी पाकच्या बलुचिस्तानमध्येच हल्ला केलाय. दहशतवाद्यांनी आर्मी स्कूल बसला टार्गेत केलंय. या स्कूल बसमध्ये दहशतवाद्यांनी मोठा स्फोट घडवून आणलाय. या स्फोटात 3 मुलांसह 5 जणांचा मृत्यू झालाय तर 38 जण जखमी झालेत. त्यामुळे दहशतवाद्यांना पोसणं, त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना शस्त्र पुरवणं हे पाकिस्तानच्या अंगाशी आल्याचं पाहायला मिळतंय. (Pakistan balochistan blast 5 people including 3 children killed in the blast)
भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाक नेहमीच दहशतवाद्यांना पाठिशी घालताना पाहायला मिळतोय. मात्र या दहशतवाद्यांनी पाकलाही अनेकदा टार्गेट केलंय. बोये बिज बबूलके तो आम कहाँसे पाये. या संत कबिरांच्या दोह्या प्रमाणे पाकिस्तानची अवस्था झालीय. हा दहशतवादच एक दिवस पाकिस्तानची राख करणार यात शंका नाही.
नैऋत्य पाकिस्तानमध्ये सकाळी एका आत्मघातकी बॉम्बर कारने शाळेच्या बसला धडक दिली. त्यानंतर बसमध्ये स्फोट झाला आणि निष्पाप मुलं या घृणास्पद कृत्याचे बळी ठरली, असे असोसिएटेड प्रेसने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं. मात्र या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही, पण बलुच फुटीरतावाद्यांवर संशय व्यक्त केला जात आहे. तेअनेकदा या प्रदेशातील सुरक्षा दलांना आणि नागरिकांना लक्ष्य करतात.
बस स्फोटानंतर, पोलीस, फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) आणि कायदा संस्थांचे कर्मचारी तपासासाठी पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. बलुचिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून बंडखोरीचा सुरू असून बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) सह अनेक फुटीरतावादी गट हल्ले करत आहेत. अमेरिकेने 2019साली बीएलएला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. यापूर्वी 6 मे रोजी, पाकिस्तानी लष्कराने सांगितले होते की बलुचिस्तानमध्ये त्यांच्या वाहनाला एका तत्कालिक स्फोटकाने धडक दिल्याने त्यांचे सात सैनिक ठार झाले होते.