)
पाकिस्तान सध्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे. एकीकडे भारताशी युद्ध पुकारुन पाकिस्तानं स्वताच्याच पायावर कु-हाड मारुन घेतली आहे. त्यात बलुचीस्तानही स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरातही पुन्हा आंदोलनं सुरु झाली आहेत. त्यामुळे पाकिस्तानची फाळणी होणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे.
पाकिस्तान सरकारविरोधात इथं जोरदार आंदोलनं सुरु आहेत. जम्मू आणि काश्मीर सुयुक्त अवामी कृती समिती म्हणजेच JKJAACच्या नेतृत्त्वात ही आंदोलनं सुरु आहेत. मुलभूत हक्कांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि वाढत्या महागाईविरोधात हे आंदोलनं सुरु आहेत. आंदोलकांनी पीओकीची राजधानी मुझफ्फराबादकडे कूच केली आणि त्याच वेळी आंदोलकांवर पोलीस आणि पाकिस्तानी निमलष्करी सैन्यानं गोळीबार केला. या गोळीबारात 10 आंदोलकांना मृत्यू झाला आहे. यात 3 पोलिसांचाही समावेश आहे. तर 100हून अधिक आंदोलक जखमी झाले आहेत. या आंदोलकांनी पाकिस्तानी सरकारसमोर 38 प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत.
यातील 3 मागण्या प्रमुख आहेत. ज्यात पाकिस्तानात स्थायिक झालेल्या काश्मिरी निर्वासितांसाठी राखीव असलेल्या विधानसभेच्या 12 जागा रद्द कराव्यात. वीज प्रकल्पांमध्ये स्थानिक लोकांना फायदा मिळावा, आणि गव्हाचं पीठ आणि वीज बिलात सवलत द्यावी यांचा समावेश आहे.
PoKमधील सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाकिस्तान सरकारने पत्रकार आणि पर्यटकांना पीओकेमध्ये प्रवेश बंदी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. इथली इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. PoKमध्ये आंदोलनाची ही पहिलीच वेळ नाही. लष्कर आणि सरकारविरुद्ध इथं अनेकदा आंदोलनं झाली आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात गव्हाचं स्वस्त पीठ आणि वीजेच्या मागणीसाठी आंदोलनं झालं होतं. मात्र त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. मुलभूत मागण्याही सरकार पूर्ण करत नसल्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आणि त्यामुळे इथल्या नागरिकांचा कल भारताकडे वाढू लागल्याची चर्चा आहे.
आधीच भारताशी युद्ध पुकारुन पाकिस्ताननं स्वताच्या पायावर कु-हाड मारुन घेतली आहे. बलुचिस्तानही स्वतंत्र होण्यासाठी झगडत आहे. त्यात आता PoKमध्येही असंतोषाची लाट निर्माण झाल्यानं पाकिस्तानची फाळणी होणार का याकडे सा-याचं लक्ष लागलं आहे.
FAQ
1) आंदोलनाचे मुख्य कारणे कोणती?
मुख्य कारणे आर्थिक संकटे आहेत, जसे वाढते वीज बिल, गहूच्या सबसिडीची कमतरता आणि पाकिस्तानच्या एकूण आर्थिक घसरण. याशिवाय, PoK मधील जलविद्युत प्रकल्पांमधून (जसे मंगला धरण) होणाऱ्या उत्पन्नाचा स्थानिकांना फायदा न मिळणे आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या विशेष सवलती (वाहने, इंधन, वैयक्तिक कर्मचारी) यांचा असंतोष आहे. हे आंदोलन २०२३ मधील वीज आणि आटा अभावाच्या विरोधात सुरू झाले आणि राजकीय बदलांपर्यंत विस्तारले.
2) आंदोलकांचे मुख्य मागण्या कोणत्या?
आंदोलकांनी ३८-बिंदूंची मागणी पत्रिका सादर केली आहे. मुख्य मागण्या: सरकारी अधिकाऱ्यांच्या विशेष सवलती रद्द करणे (वाहने, इंधन, वैयक्तिक सुरक्षा).
विधानसभेतील १२ आरक्षित जागा (पाकिस्तानमधील स्थलांतरितांसाठी) रद्द करणे.
पूर्वीच्या आंदोलकांविरुद्धचे खटले मागे घेणे.
जलविद्युत प्रकल्पांमधून रॉयल्टी मिळवणे.
आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये (टनल, पूल, आंतरराष्ट्रीय विमानतळ) गुंतवणूक.
वीज आणि गहूवर सबसिडी, कर सवलती आणि रोजगार संधी वाढवणे.
3) आंदोलन कधी आणि कसे सुरू झाले?
आंदोलन २०२३ मध्ये सुरू झाले, जेव्हा वीज बिल आणि गहू अभावाविरुद्ध निदर्शने झाली. मे २०२४ मध्ये मुजफ्फराबादकडे 'लाँग मार्च' झाला, ज्यात पाच मृत्यू झाले. सध्याचे आंदोलन २९ सप्टेंबर २०२५ रोजी पुन्हा सुरू झाले, जेव्हा सरकारने मागण्या मान्य न केल्याने JAAC ने काळे वस्त्र धारण करून निदर्शने केली. २ ऑक्टोबरला चर्चा झाली, पण ती निष्फळ ठरली.